Homeताज्या बातम्या

पुन्हा दारू विक्री केल्यास एक लाखांचा दंडअवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांची कठोर कारवाई

देवळाली प्रवरा : अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांनी कठोर पावले उचलत दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. वारंवा

संतोष पेढेकर यांची भारतीय सैन्यात निवड
AHMEDNAGAR | पावसामुळे ऊस तोड मजूरांचे मोठ्या प्रमाणात हाल
अमृतवाहिनी मॉडेल स्कुलचा दहावीचा १०० टक्के निकाल

देवळाली प्रवरा : अवैध दारू विक्रीला आळा घालण्यासाठी राहुरी पोलिसांनी कठोर पावले उचलत दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. वारंवार गुन्हे दाखल असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करत चार आरोपींकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बाँड घेण्यात आले असून, भविष्यात पुन्हा दारू विक्री करताना आढळल्यास संबंधितांकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
 राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमाच्या कलम ९३ अन्वये एकूण २१ प्रस्ताव श्रीरामपूरचे प्रांताधिकारी किरण पाटील यांच्याकडे पाठविण्यात आले होते. या प्रस्तावांपैकी चार आरोपींकडून प्रत्येकी एक लाख रुपयांचे बाँड घेण्याचे आदेश प्रांताधिकाऱ्यांनी दिले. बाँड घेतलेल्या आरोपींमध्ये अजय रामराव जाधव (रा. देवळाली प्रवरा), कोंडाजी रामदास आघाव (रा. बारागाव नांदूर), आशाबाई बाळासाहेब गायकवाड (रा. देवळाली प्रवरा) आणि प्रल्हाद शेषराव डुकरे (रा. चिंचोली फाटा) यांचा समावेश आहे.
 पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बाँड घेतल्यानंतर संबंधित आरोपी पुन्हा अवैध दारू विक्री करताना आढळल्यास त्यांचे बाँड रद्द करण्यात येईल. तसेच आरोपी व त्यांच्यासाठी जामीनदार राहिलेल्या व्यक्तीकडून एक लाख रुपयांचा दंड वसूल केला जाईल. दंडाची रक्कम न भरल्यास संबंधित आरोपी व जामीनदार यांच्या मालमत्तेच्या ७/१२ उताऱ्यावर शासनाच्या वसुलीचा बोजा चढविण्यात येणार आहे.
 यासोबतच राहुरी तालुक्यातील नागरिकांना पोलिसांनी आवाहन केले आहे की, कोणत्याही आरोपीस जामीन देताना त्याने जामिनाच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करेल याची खात्री करावी. अन्यथा आरोपीने नियमांचे उल्लंघन केल्यास जामीनदारालाही आर्थिक फटका बसू शकतो.
 ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकसंजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कारवाईचा पाठपुरावा पोलिस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, समाधान फडोळ, राजेंद्र जाधव तसेच पोलीस कर्मचारी सूरज गायकवाड, गणेश मैड, सचिन कोळी आणि वृषाली कुसळकर यांनी केली आहे.
   “अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध यापुढे अधिक कठोर कारवाई करण्यात येणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही,” दारु विक्री गुन्ह्यात बाँड करुन देणाऱ्यांची या पुढे गय केली जाणार नाही. तसेच जामिनदार होताना पुर्ण खात्री करुनच जामिनदार व्हावे.अन्यथा जामिनदाराच्या सात बारावर बोजा चढविण्यात येईल.
 –   संजय ठेंगे, पोलिस निरीक्षक,राहुरी

COMMENTS