Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर मुख्यमंत्री शिंदेंची शिष्टाई यशस्वी

तब्बल 17 दिवसांनंतर मनोज जरागेंनी सोडले उपोषण

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरां

गुजरात निवडणुकीत सुनेविरोधात सासरे
द्वेषाच्या बाजारात प्रेम वाटण्याचा प्रयत्न
विद्युत महावितरण कंपनीने विजेचा प्रश्न तात्काळ सोडवावा

जालना/प्रतिनिधी ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गेल्या 17 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे आमरण उपोषण पुकारले होते, त्यातच पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर मराठा आरक्षणाचा प्रश्‍न चिघळला होता, मात्र गुरूवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंतर आणि मनोज जरागेंशी चर्चा केल्यानंतर जरागेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्युस घेत उपोषण सोडले. मुख्यमत्री शिंदे यांच्यासोबत महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, संदीपान भुमरे, राजेश टोपे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांचीदेखील उपस्थिती होती.

उपोषण सोडल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे म्हणाले, राज्यभरात मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन ताकदीने सुरू आहे. उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्री आले, असे कधी झाले नाही. मात्र, आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जातीने लक्ष घालून उपोषण सोडवण्यासाठी आलेले आहेत. त्यामुळे आम्ही सर्व त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करतो. जरांगे यांनी यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांचेही तोंडभरुन कौतुक केले. मनोज जरांगे म्हणाले, मराठा समाजाला न्याय देऊ शकतात ते फक्त एकनाथ शिंदेच. मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी तर मागे हटणार नाहीच. पण, तीच भावना मुख्यमंत्र्यांचीही आहे. मराठा समाजाला एकनाथ शिंदेंकडून प्रचंड अपेक्षा आहे. एकनाथ शिंदेंमध्ये धाडसी निर्णय घेण्याची क्षमता आहे. मी प्रत्येक कॅबिनेट मिटींगला पाहिले आहे. गरीब मराठा समाजासाठी काय करता येईल, ही त्यांची नेहमी तळमळ असते. जरांगे म्हणाले, मी मराठा समाजाला न्याय मिळवून देणारच आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्याही मी मागेच लागणार आहे. मी मराठा समाजाला शब्द दिला आहे. मराठा समाजाच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी शांत बसणार नाही. समाजाची परवानगी घेऊनच मी आजचे उपोषण सोडत आहे. इथून पुढेही मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. त्यामुळे समाजाने काळजी करण्याची गरज नाही. जरांगे म्हणाले, माझी राखरांगोळी झाली तरी चालेल पण मी मराठा समाजाची गद्दारी करणार नाही. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला मी जो प्रस्ताव दिला आहे. त्यापासून एक इंचही मागे हटणार नाही. मराठा समाजाने माझ्यावर विश्‍वास ठेवावा. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही आणि शिंदेंनाही हटू देणार नाही, असे जरांगे यांनी यावेळी सांगितले.

आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही ः मुख्यमंत्री शिंदे
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असे आश्‍वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणस्थळी दिले. तसेच मनोजला भेटायचे हे मी ठरवले होते. आपली भूमिका मी अगदी स्पष्टपणे मांडली आहे, उपोषण सोडले त्याबद्दल आभारी आहे असेही शिंदेंनी सांगितले. आंदोलन करणे, आमरण उपोषण करणे ते जिद्दीने पुढे नेणे आणि त्याला महाराष्ट्रात जनतेचा प्रतिसाद मिळतो हे फार कमी वेळी पाहायला मिळते. ज्याचा हेतू शुद्ध असतो त्याच्यामागे जनता पाहायला मिळते, असेही मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले.

आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाहीः मनोज जरांगे – मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मागे हटू देणार नाही, असा इशारा गुरूवारी उपोषण सोडताना मनोज जरांगे पाटील यांनी दिला. तब्बल 16 दिवसांनंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपले आमरण उपोषण मागे घेतले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन आपण एक इंचही मागे हटणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. तसेच, मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी आम्ही सरकारला एका महिन्याची मुदत दिली आहे. ती मुदत आणखी दहा दिवसांनी वाढवून देतो. पण, मराठा समाजाला आरक्षण द्या, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.

COMMENTS