Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनीत राणांविरोधात 100 कोटींचा दावा

काँगे्रस नेत्या यशोमती ठाकूर आक्रमक

अमरावती/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायमच चर्चेत राहणारे राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमरावतीच्या राजकारणात कधी आमदार बच

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध
नवनीत राणाच महायुतीच्या उमेदवार
उद्धव ठाकरे अहंकारी असुन महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दिसेल

अमरावती/प्रतिनिधी ः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने कायमच चर्चेत राहणारे राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अमरावतीच्या राजकारणात कधी आमदार बच्चू कडू यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य तर कधी, उद्धव ठाकरेंच्या मातोश्री बंगल्यासमोर हनुमान चाळीसा म्हणण्याचा अट्टाहास तर, आता काँगे्रस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर केलेले भ्रष्टाचाराचे आरोप यामुळे राणा दाम्पत्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
खासदार नवनीत राणा यांच्या वक्तव्याविरोधात काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर कायदेशीर लढा देणार आहेत. यशोमती ठाकूर या नवनीत राणा यांच्या विरोधात 100 कोटी रूपयांचा अब्रु नुकसानीचा दावा ठोकणार आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, नवनीत राणा यांनी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्याकडून पैसे घेतले. मात्र प्रचार दुसर्‍याचा केला, असे त्या म्हणाल्या होत्या. नवनीत राणा यांच्या या वक्तव्यानंतर आमदार यशोमती ठाकूर यांनी आक्रमक भूमिका घेत कायदेशीर लढाईचा इशारा दिला आहे. यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्याविरोधात 100 कोटींच्या अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार आहेत. लोकसभा निवडणूकीच्या काळात जर मला पैसे दिले असतील तर त्याची माहिती निवडणूक आयोगाकडे नाही का? एवढा मोठा आरोप झाल्यानंतरही राणा दांपत्यावर कारवाई का होत नाही? ईडी, सीबीआय काय करत आहे? असे सवाल आमदार ठाकूर यांनी उपस्थित केले. तसेच यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. फडणवीसांना शेतकर्‍यांसाठी वेळ नाही, मात्र ते दहीहंडीच्या कार्यक्रमात जातात. ज्या शिल्पा शेट्टीच्या पतीने ब्लू फिल्म तयार केल्या त्या शिल्पा शेट्टी सोबत देवेंद्र फडणवीस उभे राहतात, असा घणाघात यशोमती ठाकूर यांनी केला.

COMMENTS