अवकाळीच्या कळा…

Homeताज्या बातम्यासंपादकीय

अवकाळीच्या कळा…

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर

जातीनिहाय जनगणना आणि आरक्षण
मनच सर्व गुणांचे उगमस्थान
सत्तासंघर्षात शिंदे गटाची गोची

उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रासह कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गाच्या काही भागात विजांच्या कडकडासह पाऊस कोसळ्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याची अशी शक्यता खरी असतेच असे नव्हे. हा त्यांचा अंदाजही कधी कधी अवकाळीसारखा बरोबर लागतो. सध्या उत्तर महाराष्ट्रात नाशिक, अहमदनगर तर पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही अवकाळी हवा आणि पाऊस शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान करणारे असते. शेतकऱ्यासह तसे ते सर्वांचे नुकसान करणारे असते. हे जरी खरे असले तरी, त्याचे मूळ हे माणसाने पर्यावरणाचे केलेले नुकसान यात आहे. माणसांनी पर्यावरणाला बाधा पोहचेल आणि पर्यावरण बिघडेल असे धोरण राबविल्यामुळे हे सर्व घडते. त्याची साधी दखल ना नागरिक घेतात ना सरकार. मग ते नागरिक आणि सरकार कोणत्याही देशाचे असो. अवकाळी पाऊस, अवकाळी वादळ या समस्या जागतिक पातळीवरच्या आहेत. असे होऊ नये यावर सर्वत्र चर्चा होते हे खरे पण. त्यासाठीचे नियम आणि ठराव जागतिक पातळीवर प्रत्येक वर्षी घेतले जातात पण, प्रत्यक्षात कृती करायची कुणी? हा गंभीर प्रश्न.
महाराष्ट्रात प्रत्येक वर्षी अवकाळी पाऊस पडतो. यात सर्वांचेच नुकसान होत असते. शुक्रवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास अहमदनगर जिल्ह्यातील काही भागात जोरदार अवकाळीचा सरी बरसल्या. यात राहता शहरासह परिसरात अवकाळी पावसाने अनपेक्षितपणे मुसळधार, हजेरी लावली. वादळी वारे, त्यात जोरदार पाऊस आल्याने शेतातील काढणी केलेली पिके झाकून ठेवण्यासाठी शेतकऱ्यांना वेळ भेटला नसल्याने त्यांची एकच धांदल उडाली. या पावसाने द्राक्ष, आंबा, चिकू, फळबाग बागायतदार शेतकरी यांची चिंता अधिक वाढली आहे. द्राक्ष बागायतदार,आंबा, टरबूज, खरबूज तसेच गहू, हरबरा, ज्वारी, कांदा या पिकाला फटका बसला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हा अवकाळी पाऊस बरसला असून अनेक शेतकऱ्यांचे यात नुकसान झाल्यामुळे सरकारने या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून त्यांना आर्थिक मदत करणे क्रमप्राप्त. पण, ही अवकाळी मदत सरकारने केली तरी मूळ प्रश्न शिल्लक राहतो. तो म्हणजे पर्यावरण संतुलनाचा. सर्वानी पर्यावरणाचे संतुलन टिकावे आणि नैसर्गिक संकटे उध्दभवणाराच नाहीत यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी अनेक कायदेशीर तरतुदी आहेत मात्र ते वर्तनातून कायदे पाळले जात नाहीत. त्यामुळे पर्यावरण वाचवण्यासाठी कितीही कठोर नियम केले तरी प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी किती प्रमाणात होते यावर ते अवलंबून असते.
पर्यावरणातल्या साखळीमध्ये मानवाने हस्तक्षेप केल्यामुळे त्याचे परिणाम सर्व जगाला भोगावे लागत आहेत. पर्यावरण टिकले तरच माणूस टिकेल हे सर्वानी लक्षात घेणे आवश्यक. पर्यावरणातला प्रत्येक जीव हा दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो. त्यामुळे प्रत्येक जीव जगणे गरजेचेच. नसता त्यातील एक जीव नामषेश झाला की, त्यावर अवलंबून असणारे अनेक जीव नामशेष होत असतात. त्यामुळे आजच्या अवकाळीचा सरी बरसतात त्याला निसर्ग नव्हे तर माणूस जबाबदार आहे. याचे निदान होणे आवश्यक. नसता अवकाळीच्या कळा कायमच्याच.

COMMENTS