कर्जत तालुक्यात खुलेआम चालते गावठी दारूची वाहतूक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत तालुक्यात खुलेआम चालते गावठी दारूची वाहतूक

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील हातभट्टीची दारु वाहतूक व विक्री कमी होताना दिसत नाही. करमनवाडी- खेड मार्गावरुन अनेक वर्षांपासून सुरु असलेली गावठी

Sangamner : संगमनेरमध्ये मुसळधार पाऊस| LokNews24
सोशल मीडियावर आक्षेपार्ह मेसेज टाकणाऱ्या एका विरुद्ध गुन्हा दाखल 
Shrirampur : शेततळ्यात बुडून तीन लहान मुलांचा दुर्दैवी मृत्यू (Video)

कर्जत/प्रतिनिधी : कर्जत तालुक्यातील हातभट्टीची दारु वाहतूक व विक्री कमी होताना दिसत नाही. करमनवाडी- खेड मार्गावरुन अनेक वर्षांपासून सुरु असलेली गावठी दारूची वाहतूक सुरूच आहे. बुधवारी सकाळी पावणेआठ वाजेच्या सुमारास एका व्यक्तीकडून पोत्यात गुंडाळलेल्या ट्यूबमधून गावठी दारूची वाहतूक होत असलेली दिसून आली.
कर्जत तालुक्यातील अवैध धंदे काही कमी होताना दिसत नाहीत. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीमुळे सावकारांचे धाबे दणाणले. वाहतुकीला शिस्त लागली. ग्रामसुरक्षा यंत्रणा सक्षम झाली. लोकाभिमुखतेमुळे पोलीस प्रशासन आणि जनता यातील अंतर कमी झाले. 
मात्र कित्येकांचे संसार उध्वस्त करणाऱ्या गावठी दारूची वाहतूक व विक्रीमुळे तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्जत तालुक्यातील या व्यवसायांकडे पूर्ण दुर्लक्ष असल्याने हे धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावले आहेत. दिवसा दारूची अवैध वाहतूक होत असताना प्रशासकीय यंत्रणा करते काय ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.Attachments area

COMMENTS