Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

म्हाडाच्या 5 हजार 309 सदनिकांसाठी लॉटरी

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई ही स्वप्ननगरी असून, या नगरीमध्ये प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे नेहमीच वाटत असते. मात्र वाढत्या किंमतीमुळे अनेका

विधान परिषद निवडणुकीसाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय | LOK News 24
संजय राऊतांची होणार शिवसेनेतून हकालपट्टी ?
 लव्ह जिहादच्या विरोधात सकल हिंदू जन आक्रोश मोर्चा

मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई ही स्वप्ननगरी असून, या नगरीमध्ये प्रत्येकाला आपल्या हक्काचे घर असावे असे नेहमीच वाटत असते. मात्र वाढत्या किंमतीमुळे अनेकांचे स्वप्न पूर्ण होत नाही, मात्र आता म्हाडाच्या कोकण मंडळ परिक्षेत्रातील तब्बल 5 हजार 309 सदनिकांच्या सोडतीची जाहिरात आज (शुक्रवार, 15, सप्टेंबर) रोजी प्रसिद्ध होणार आहे.
जाहिरात प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून म्हणजे आजपासूनच या सदनिकांसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. या घरांसाठीची सोडत नोव्हेंबर 2023 मध्ये काढली जाण्याची शक्यता आहे. पाच हजार 309 घरांच्या या सोडतीमध्ये अत्यल्प उत्पन्न गट, अल्प, मध्यम आणि उच्च अशा चारही उत्पन्न गटांतील घरांचा समावेश असेल. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक योजना, प्रथम प्राधान्य, म्हाडा गृहनिर्माण आणि पंतप्रधान आवास योजना अशा योजनेतील ही घरे आहेत. म्हाडाच्या कोकण मंडळाने 5 हजार 309 घरांच्या सोडतीची जाहिरात काढण्याची घोषणा केली आहे. 15 सप्टेंबरपासून यासाठी अर्ज विक्री सुरू होणार आहे. याआधी म्हडाच्या कोकण मंडळाकडून 4 हजार 654 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली होती. मात्र या सोडतीला लोकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याने या सोडतीमधील अनेक घरांची विक्री झाली नव्हती. त्यामुळेच या योजनेतील शिल्लक घरांसह नवीन योजनेतील सदनिकांची सोडत काढण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 5 हजार 309 घरांसाठी नोव्हेंबरमध्ये सोडत काढण्यात येणार आहे. या घरांसाठी इच्छुक शुक्रवारी, 15 सप्टेंबरला जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज करू शकणार आहेत.

COMMENTS