Homeताज्या बातम्या

अंमली पदार्थांचा पुरवठा हा शत्रू राष्ट्रांचा कट; तरुणांनी हा कट हाणून पाडावा: पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली: देशात अंमली पदार्थांचा वाढता पुरवठा हा केवळ गुन्हेगारीचा विषय नसून, तो शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी कटाचाच एक भाग असल्याचा गंभीर इशार

धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डा नव्हे तर भगदाड,अपघाला निमंत्रण-डॉ.गणेश ढवळे
नोटबंदीच्या याचिका निकालात ! 
मुंबई काँगे्रस कमिटीच्या कार्यालयावर केलेल्या हल्ल्याचा निषेध
Maharashtra Day 2025 News PM Narendra Modi wishes Maharashtra Day in  Marathi | "राज्य प्रगतीचा एक मजबूत आधारस्तंभ", पंतप्रधान मोदींनी मराठीत  दिल्या महाराष्ट्र दिनाच्या ...

नवी दिल्ली: देशात अंमली पदार्थांचा वाढता पुरवठा हा केवळ गुन्हेगारीचा विषय नसून, तो शत्रू राष्ट्रांच्या दहशतवादी कटाचाच एक भाग असल्याचा गंभीर इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. भारतीय तरुणांना व्यसनाच्या जाळ्यात अडकवून देशाची शक्ती कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असून, हा कट समाजाने एकजुटीने हाणून पाडला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.

‘विकसित भारतासाठी व्यसनमुक्त युवा संकल्प अभियान’ या राष्ट्रव्यापी उपक्रमाचा प्रारंभ रविवारी दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे करताना पंतप्रधान बोलत होते. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील युवक शारीरिक, मानसिक आणि नैतिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असून, व्यसनमुक्त समाज ही त्यासाठीची पहिली अट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधानांनी सांगितले की, पुढील शंभर आठवडे प्रत्येक रविवारी देशभरात विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात येतील. या माध्यमातून व्यसनमुक्तीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जाईल. या अभियानाचे नेतृत्व युवकांनी स्वीकारून सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडवण्याच्या ध्येयात सक्रिय योगदान द्यावे, असेही आवाहन त्यांनी केले.

पंतप्रधान म्हणाले की, व्यसनामुळे तरुणांचे ध्येय, मेहनत आणि भविष्य धोक्यात येते. आज भारतीय युवक विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळवत असताना अंमली पदार्थांच्या जाळ्यात अडकलेला तरुण केवळ स्वतःचेच नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करतो. पालकांची स्वप्ने, भावंडांच्या अपेक्षा आणि कुटुंबाचा आधार या सर्वांवर व्यसनाचा घाला बसतो.

भारतीय युवकांना अंमली पदार्थांच्या आहारी घालून देशाची प्रगति रोखण्याचा प्रयत्न शत्रू राष्ट्रांकडून होत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला. त्यामुळे अंमली पदार्थांचा प्रश्न केवळ सामाजिक नसून राष्ट्रीय सुरंशीही संबंधित आहे. या पार्श्वभूमीवर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळ्यांविरोधात सरकार कठोर कारवाई करत असल्याचे त्यांनी सांगितले.

अंमली पदार्थ काही काळासाठी आनंदाची भ्रामक भावना निर्माण करतात; मात्र त्यातून शिक्षण, रोजगार, कुटुंब आणि आरोग्य यांचे अपरिमित नुकसान होते, असे पंतप्रधानांनी नमूद केले. भारतीय संतपरंपरेनेही व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश दिला आहे. व्यसनामुळे माणसाचा विवेक नष्ट होतो आणि तो अधोगतीकडे जातो, असे त्यांनी सांगितले.

एक कोटीहून अधिक युवकांचा सहभाग

अभियानाच्या प्रारंभी देशभरातील युवकांनी एकाच वेळी व्यसनमुक्त भारताची शपथ घेतली. दूरचित्रसंवाद प्रणालीद्वारे देशातील सुमारे २८ हजारांहून अधिक ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात १ कोटीहून अधिक युवक सहभागी झाल्याची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमात विविध आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर, विविध राज्यांचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच अनेक सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

शंभर आठवड्यांचे राष्ट्रव्यापी अभियान

हे अभियान पुढील १०० आठवडे अखंड सुरू राहणार असून, प्रत्येक रविवारी देशभरात विविध जनजागृती उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, युवक संघटना, सामाजिक संस्था, उद्योग क्षेत्र आणि आध्यात्मिक संघटनांच्या सहकार्याने व्यसनमुक्तीचा संदेश प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल.

COMMENTS