Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तोतया महिला आमदाराला अटक

ठाणे ः अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधीमंडळ सदस्याचे स्टिकर लावले

संजय शिरसाठ यांच ट्विट म्हणजे त्यांच्या आंतरातम्याचा आवाज.
हजारो आदिवासी महिलांचे धरणे आंदोलन ‘पेसा ग्रामसभा मोबिलायझर्सची’ पदे कमी करण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणी
सुप्रसिद्ध दिग्दर्शक विवेक वाघ यांचे निधन

ठाणे ः अंबरनाथमध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित महिलेने लोकांना फसवण्यासाठी आपल्या गाडीवर विधीमंडळ सदस्याचे स्टिकर लावले होते. हे स्टिकर दाखवून महिला आपण आमदार असल्याचे भासवत होती. एका व्यक्तीची 5 लाखांची फसवणूक केल्यानंतर या महिलेचे बिंग फुटले आहे. याप्रकरणी अंबरनाथ पश्‍चिम पोलिसांनी या महिलेसह दोघांना अटक केली आहे. वंदना संजय मिश्रा असे तोतया आमदाराचे नाव आहे. अनमोल कुमार सिंह यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

COMMENTS