Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनसे नेते अविनाश जाधववर खंडणीचा गुन्हा

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश ज

आष्टी येथील बी. फार्मसी व एम फार्मसी कॉलेजचा विद्यापीठ परीक्षेत सरासरी 98% निकालडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ ,छत्रपती संभाजीनगर फार्मसी विभागाचा निकाल जाहीर
फार्मर आयडीच्या तांत्रिक अडचणींवर तातडीने पर्याय काढा : बोरुडे
पळवापळवीतून सत्तेचे व्यवस्थापन करणे हा जनताद्रोहच!

मुंबई ः लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना मनसे नेते अविनाश जाधव आणि वैभव ठक्कर यांच्यावर पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. सराफा शैलेश जैन (वय 55) यांच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार, जैन यांनी वैभव ठक्करला झवेरी बाजार येथील आपल्या कार्यालयात हिशेबासाठी बोलावले होते. त्यावेळी अविनाश जाधव आणि त्यांचे सहकारी तिथे आले. जाधव यांच्यासह त्यांच्या सहकार्‍यांनी पोलिसांसमोर जैन यांचा मुलगा सौमिल याला मारहाण केली. इतकेच नाही, तर जैन यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी देखील मागितली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

COMMENTS