Homeताज्या बातम्या

प. बंगालमध्ये रिफायनरी प्रकल्पात स्फोट15 कर्मचारी जखमी, रेल्वे सेवेवरही परिणाम

कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील हल्दिया औद्योगिक परिसरात मंगळवारी पहाटे नॅफ्था पुरवठा रिफायनरीमध्ये स्फाट झाला, त्यानंतर य

लखनऊमध्ये आगीचे तांडव! २० हून अधिक सिलेंडरचे स्फोट आणि शेकडो संसार खाक
मुंबईत माटुंगा रेल्वे वर्कशॉपमध्ये मोठी आग; पाहा थरारक दृश्ये
गॅस सिलिंडरच्या स्फोटात महिलेचा मृत्यूछत्रपती संभाजीनगरातील घटना ; नऊ जणांचा वाचले प्राण


कोलकाता : पश्‍चिम बंगालमधील पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील हल्दिया औद्योगिक परिसरात मंगळवारी पहाटे नॅफ्था पुरवठा रिफायनरीमध्ये स्फाट झाला, त्यानंतर या स्फोटामुळे लागलेल्या आगीत 15 जण जखमी झाले. जखमींवर जवळील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असून त्यांपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या दुर्घटनेमुळे स्थानिक रेल्वे सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चार वाजण्याच्या सुमारास हल्दिया पेट्रोकेमिकल्सच्या नॅफ्था पुरवठा वाहिनीमध्ये अचानक स्फोट झाला. त्यानंतर काही क्षणांतच आगीने विक्राळ रूप धारण केले आणि हल्दिया नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 मधील चिरंजीबपूर परिसरापर्यंत तिचा फैलाव झाला. स्फोटाचा मोठा आवाज ऐकून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेकांनी तातडीने घरे सोडून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. आगीमुळे काही घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या बारा गाड्या घटनास्थळी दाखल करण्यात आल्या. अग्निशमन जवान आणि बचाव पथकांनी संयुक्तपणे बचावकार्य राबवून जखमींना बाहेर काढले. आग विझविण्याचे काम बराच काळ सुरू होते. जखमींना प्रथम हल्दिया उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी पाच जणांना पुढील उपचारांसाठी तमलुक वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले असून दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे प्राथमिक अहवालातून स्पष्ट झाले आहे. घटनेनंतर स्थानिक जनप्रतिनिधींनी रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. प्राथमिक अंदाजानुसार नॅफ्था वायूची गळती झाल्यामुळे स्फोट होऊन आग लागली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

COMMENTS