Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलांना शिक्षण देण्याचा महात्मा फुलेंचा निर्णय क्रांतीकारी होता

पुष्पाताई काळे ः कोपरगावमध्ये महात्मा फुलेंची जयंती उत्साहात

कोपरगाव प्रतिनिधी : शिक्षणाचा अभाव असल्यामुळे समाजात रूढी, परंपरा जोपासल्या जावून समाजात अज्ञानाचा अंधार पसरला होता. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार हो

राहुरी कॉलेजमधील शेकडो झाडांना आस पाण्याची
लोणीतील गौरी सजावट बक्षीण वितरण उत्साहात
मारहाणप्रकरणातील सर्व 14 आरोपींना तुरुंगवास

कोपरगाव प्रतिनिधी : शिक्षणाचा अभाव असल्यामुळे समाजात रूढी, परंपरा जोपासल्या जावून समाजात अज्ञानाचा अंधार पसरला होता. त्यामुळे शिक्षणाचा प्रसार होणे गरजेचे होते. जोपर्यंत महिला शिक्षण घेणार नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्यावेळी स्त्री शिक्षणाचा निर्णय घेतला. त्या निर्णयामुळे आज महिला शिक्षण घेवून स्वावलंबी तर झाल्या आहेत त्याचबरोबर देशाच्या सर्वोच्च पदावर देखील महिला विराजमान आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले यांनी महिलांना शिक्षण देण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय समाज परिवर्तनात मैलाचा दगड ठरला असल्याचे प्रतिपादन गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी कोपरगाव येथे केले.

शैक्षणिक क्रांतीसाठी आपले संपूर्ण जीवन अर्पण करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती कोपरगावात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सौ. पुष्पाताई काळे यांनी महात्मा जोतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले याप्रसंगी त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, शिक्षणामध्ये किती ताकद आहे व शिक्षण काय परिवर्तन घडवू शकते हे महात्मा ज्योतिबा फुले यांना ज्ञात होते. त्यामुळे त्यांनी स्त्रियांना शिक्षण देण्याचा क्रांतिकारी निर्णय घेवून महिलांना शिक्षण देण्याचा निर्णय घेवून शिक्षणा अभावी समाजात निर्माण झालेला अज्ञानाचा गडद अंधार त्यांनी शिक्षणाच्या प्रकाशातून दूर केला.त्यामुळे आज राजकारण, समाजकारणाबरोबरच महिला विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने दिसत आहे असे सौ. पुष्पाताई काळे यांनी सांगितले. यावेळी पद्माकांत कुदळे, रवीकाका बोरावके, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक दिनार कुदळे, माजी नगरसेवक विरेन बोरावके, सौ. माधवी वाकचौरे, रमेश गवळी, दिनकर खरे, राजेंद्र गिरमे, ऋषिकेश खैरनार, एकनाथ गंगूले, राजेंद्र खैरनार, बापू इनामके, सतिश भुजबळ, विशाल राऊत, बाळासाहेब पांढरे, बापू वढणे, अनुप गिरमे, प्रदीप नवले, उत्तमराव गिरमे, सचिन बोरावके, विजय त्रिभुवन, गिरीश हिवाळे, संजयजी कुदळे, सुमित भोंगळे, प्रकाश रासकर, कैलास जगझाप, वैभव गिरमे, संगिता मालकर, जयश्री बोरावके, शीतल लोंढे, भाग्यश्री बोरुडे, कविता बोरावके, वैजयंती बोरावके आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS