Homeताज्या बातम्या

वेली हटवून साकुरीतील वीज रोहित्र केले सुरक्षित लोकमंथनच्या वृत्ताची दखल ; महावितरणची तात्काळ कारवाई

राहाता : साकुरी येथील महावितरणच्या वीज रोहित्रावर वाढलेल्या वेली आणि झुडपांमुळे निर्माण झालेल्या धोकादायक परिस्थितीबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची महावितरण प्रशासनाने तात्काळ दखल घेत संबंधित वीज रोहित्रावरील सर्व वेली हटवून परिसर स्वच्छ केला आहे. या त्वरित कारवाईमुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, संभाव्य धोका टळल्याची भावना व्यक्त केली आहे.काही दिवसांपासून वीज रोहित्र पूर्णपणे वेलींच्या विळख्यात अडकल्याने शॉर्टसर्किट, आग लागणे किंवा वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका निर्माण झाला होता. या गंभीर बाबीकडे लक्ष वेधणारे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तातडीने आवश्यक उपाययोजना केल्या. कर्मचाऱ्यांनी वीज रोहित्राभोवती वाढलेल्या वेली व झुडपे हटवून परिसर सुरक्षित केला.ग्रामस्थांनी महावितरणच्या या तत्पर कारवाईचे स्वागत केले असून, लोकहिताच्या प्रश्नांवर प्रसारमाध्यमांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने त्वरित दखल घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच अशाच प्रकारे गावातील इतर वीज रोहित्रांचीही नियमित तपासणी करून देखभाल करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.साकुरीतील या घटनेमुळे लोकांच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर वेळेत दखल घेतल्यास संभाव्य दुर्घटना टाळता येऊ शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. महावितरणने भविष्यातही वीज यंत्रणांची नियमित देखभाल, परिसराची स्वच्छता आणि धोकादायक वेली-झाडे हटविण्याची मोहीम सातत्याने राबवावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

 सुभद्रा फलके यांचे निधन
वटपौर्णिमेनिमित्त संभाजी ब्रिगेडकडून पुस्तकांचे वाटप
तहसील कार्यालयात लोकशाही दिन नियमित घेण्याची मागणी

COMMENTS