Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉ. भास्कर मोरेला एक दिवसाची पोलिस कोठडी

रत्नदीप संस्थेच्या चौकशीसाठी समिती स्थापन

जामखेड ः रत्नदीपचे डॉ. भास्कर मोरे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरच्या पोलिसांनी 13 मार्च रोजी रात्री अटक केली होती. 14 रोजी जामखेड न्

बनावट सोने प्रकरणातील 160 जणांना पकडण्याचे शेवगाव पोलिसांसमोर आव्हान
जामखेडच्या राजकारणात धक्कातंत्र ;
आ.प्राजक्त तनपुरे यांच्यावर नगर,नाशिकची जबाबदारी

जामखेड ः रत्नदीपचे डॉ. भास्कर मोरे यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहमदनगरच्या पोलिसांनी 13 मार्च रोजी रात्री अटक केली होती. 14 रोजी जामखेड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. रत्नदीप मेडिकल अँड फार्मसी रिसर्च सेंटर या कॉलेजचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरेंवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींची आर्थिक शारीरिक व मानसिक छळ करत असल्याचा गंभीर आरोप व मुलींच्या फिर्यादीवरून 8 मार्च रोजी जामखेड पोलीस स्टेशनला डॉ. भास्कर मोरे यांच्या विरोधात विनयभंगाचा देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या डॉ. मोरे यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी इंदापूर भिगवण येथून उसाच्या शेतातून अटक केली होती.
आमदार प्रा. राम शिंदे यांनी दुरध्वनीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बरोबर संपर्क करुन आंदोलन कर्त्यांशी संवाद साधला.  त्या अनुषंगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी रत्नदीपच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ आहेत तर सदस्य पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे, जिल्हा आरोग्याधिकारी बापुसाहेब नागरगोजे, नाशिक विद्यापीठाचे नरहरी कळसकर, डॉ. मनीष इनामदार, संदीप कुलकर्णी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे संदीप पालवे, जी. वाय दायमा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ लोणारेचे डॉ. विशाल पांडे, एच.एस. जोशी, जिल्हा शासकीय तंत्रनिकेतन नाशिकचे डॉ. जी. व्ही गर्जे, अहमदनगर जिल्हा महीला बालकल्याण विकास अधिकारी बी. बी. वारुडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी कर्जत नितीन पाटील अशा 15 जणांचा समितीमध्ये समावेश आहे. रत्नदीपच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींचे आरोप तक्रारी, अतिरिक्त फी, काँलेज समायोजन करणे, क्रास कोर्स  या सर्व प्रकरणाचा गांभीर्याने आभ्यास करुन 15 दिवसात अहवाल सादर करावा असे आदेश या समितीला देण्यात आले आहेत. तसेच हरीण पाळल्यामुळे वनविभागाचाही गुन्हा दाखल आहे त्याबाबत काय निर्णय येतो याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

COMMENTS