Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वृद्ध महिलेस मारहाण करून ५० हजारांची धाडसी चोरी; दोन चोरटे अटकेत

कर्जत (प्रतिनिधी) – कर्जत शहरातील शारदा नगर परिसरामध्ये राहत असणाऱ्या वृद्ध महिलेस मारहाण करून 50 हजार रुपयांची धाडसी चोरी करण्याची घटना घडली

इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी सर्वांचे योगदान आवश्यक : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
देगलूरच्या उपजिल्हा रुग्णालयावरून श्रेयवादाची ठिणगी; खा. डॉ. अजित गोपछडे विरुद्ध आ. जितेश अंतापूरकर आमनेसामने
शिंगारवाडी येथे भीषण कृत्रिम पाणीटंचाई; लाखो रुपयांच्या योजनेनंतरही गावकर्‍यांवर पाणीसंकट

कर्जत (प्रतिनिधी) –

कर्जत शहरातील शारदा नगर परिसरामध्ये राहत असणाऱ्या वृद्ध महिलेस मारहाण करून 50 हजार रुपयांची धाडसी चोरी करण्याची घटना घडली होती .याप्रकरणी पोलिसांनी कर्जत शहरातीलच दोघाजणांना अटक केली असून ,त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

याबाबत घडलेली घटना अशी की ,शहरातील शारदानगर येथे राहत असणाऱ्या राजूबाई हंबाडे वय 68 वर्ष या त्यांच्या शेजारी राहत असणाऱ्या गिताबाई भगत यांच्या समवेत पंढरपूर येथे देवदर्शनासाठी गेल्या होत्या. रात्री साडेदहा वाजता त्या परत आल्या तेव्हा त्यांच्या घराच्या कडी, कोयंडा तुटलेला दिसला व घरामध्ये कसलातरी आवाज येत असल्यामुळे त्यांनी जोरात  आरडाओरड केली. त्यांचा आवाज ऐकून घरामध्ये चोरी करत असणारे दोघेजण बाहेर पळत आले आणि त्यांनी राजूबाई हंबाडे यांना जोरदार धक्का दिला त्यामध्ये त्या खाली पडल्या आणि त्यांना तोंडाला आणि डोक्याला मार लागला. चोरटे त्या ठिकाणाहून पळून गेले. दरम्यान आवाज ऐकून शेजारची लोक धावत आले. त्यानंतर त्यांनी घरामध्ये जाऊन पाहणी केली. सर्वत्र सामानाची उचकापाचक करण्यात आली होती व कुकरच्या डब्यामध्ये ठेवलेले 50 हजार रुपयांची रोकड चोरून नेली होती. अशी फिर्याद कर्जत पोलीस स्टेशनमध्ये या चोरीच्या संदर्भात तक्रार दिली. 

कर्जत येथील पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तपास करून या प्रकरणी  शहरातील कौस्तुभ भानुदास क्षीरसागर राहणार वीर वस्ती व अभिषेक प्रवीण जगताप या दोघांना अटक करून ताब्यात घेतले. यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हजर केले असता त्यांनी  गुन्ह्याची कबुली देत चोरी केलेली रक्कमही परत केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक यांनी दिली.

COMMENTS