Homeताज्या बातम्या

कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. बरबडेकर्जत : कर्जत तालुका पोल्ट्री असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीची निवड नुकतीच पार पडली.

तालुक्यातील ईसी व नॉन-ईसी पोल्ट्री फार्मर्सच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत डॉ. संदीप बरबडे यांची अध्यक्षपदी, अण्णासाहेब भोसले यांची उपाध्यक्षपदी, किरण भैलुमे यांची सचिवपदी तर शैलेश गुंड यांची खजिनदारपदी एकमताने निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. संदीप बरबडे यांनी सांगितले की, “पोल्ट्री व्यवसाय हा आता केवळ व्यवसाय राहिलेला नाही, तर हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न बनला आहे. कंपन्यांची मनमानी, लिफ्टिंगमधील अडचणी, अपुरा दर आणि शासनाच्या धोरणांमुळे व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे सर्वांनी संघटित होऊन आपल्या हक्कासाठी लढा देण्याची गरज आहे.”बैठकीत नितीन तोरडमल, प्रफुल्ल बरबडे, सागर भैलुमे, संदीप धोदाड, परमेश्वर मोहिते, आजिनाथ पठाडे, प्रदीप मांडगे, रावसाहेब शिंदे, वैभव सुद्रिक, ओंकार लंगोरे, भूषण जगताप, रवींद्र नेवसे, रोहन राऊत आणि विजय गुंड यांनी मनोगत व्यक्त करत पोल्ट्री व्यवसायासमोरील अडचणी मांडल्या.बैठकीत पोल्ट्री व्यावसायिकांच्या दहा प्रमुख प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.उपाध्यक्ष अण्णासाहेब भोसले म्हणाले, “आता तालुक्यातील कोणताही पोल्ट्री व्यावसायिक एकटा राहणार नाही. असोसिएशन प्रत्येक सदस्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील.”सचिव किरण भैलुमे यांनी प्रास्ताविक केले, तर शैलेश गुंड यांनी आभार मानले. बैठकीस तालुक्यातील मोठ्या संख्येने पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

विशेष मोहिमेत श्रीगोंदा पोलिसांची मोठी कारवाईअजामीनपात्र वॉरंटमधील २१ आरोपी अटकेत; अनेकांची तुरुंगात रवानगी
बदलत्या हवामानात शाश्वत शेतीचे नियोजन गरजेचे : कुलगुरू खर्चे
 सुभद्रा फलके यांचे निधन

COMMENTS