Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वतःच्या अपूर्ण इच्छांचे ओझे मुलांवर लादू नका

गुणवंतांच्या गौरव सोहळ्यात पत्रकार गोविंद शेळके यांचे पालकांना आवाहन

अंबाजोगाई प्रतिनिधी - कुठल्या कारणास्तव तुमची डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करण्याचे ओझे तुमच्या मुलानावर लादू

शिवसेनेच्यावतीने महागाईच्या विरोधात सायकल रॅली
रस्ते विकास कामावरून भाजप विरोधकांमध्ये संघर्ष 
राजकीय निवाडा..

अंबाजोगाई प्रतिनिधी – कुठल्या कारणास्तव तुमची डॉक्टर, इंजिनिअर बनण्याची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर ती पूर्ण करण्याचे ओझे तुमच्या मुलानावर लादू नका. त्यांना आवडीच्या क्षेत्रात करिअर करू द्या असे आवाहन एबीपी माझाचे पत्रकार गोविंद शेळके यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांना केले.
अंबाजोगाईत बुधवारी वसुंधरा सेवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित गुणवंतांचा गौरव सोहळा दिमाखात पार पडला. यावेळी गोविंद शेळके यांनी विद्यार्थ्यांना करिअर विषयक मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, मोठे स्वप्न बघायचे असेल तर स्वतःला आधी ओळखा. तुमच्या अंगीभूत असणार्‍या कला, कौशल्यांना कुठे वाव आहे हे समजून घ्या आणि त्यानुसार क्षेत्र निश्चित करून कष्ट करा आणि ध्येय साध्य करा. आपल्या देशाला इंजिनिअर, डॉक्टरांची तर गरज आहेच, परंतु त्यासोबतच शास्त्रज्ञ, वकील, सैनिक, सीए आदींची सुद्धा तेवढीच गरज आहे. त्यामुळे पालकांनी मुलांना विशिष्ट अभ्यासक्रमासाठी आग्रह न धरता विश्वासात घेऊन त्यांना कुठल्या क्षेत्रात स्वारस्य आहे याबाबत जाणून घ्यावे. सध्याच्या काळात प्रत्येक क्षेत्रात भवितव्यासाठी तेवढाच वाव आहे. त्यामुळे मुलांना आवडीच्या क्षेत्रात करिअर घडविण्यासाठी प्रोत्साहन द्या असे आवाहन गोविंद शेळके यांनी केले. यावेळी व्यासपीठावर बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुधोळ, केज विधानसभा मतदार संघाच्या आमदार नमिता मुंदडा, मानवलोकचे कार्यवाह अनिकेत लोहिया, प्राचार्य बाबू खडकभावी यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात सातशे गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

COMMENTS