Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ घराच्या वाढणार किमती

सांगली / प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यात इंधनाचे दर जोरदार भडकले आहेत. वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याच्या दरात 30 ते 50

हरियाणात भाजप सरकार कोसळणार ?
ललित पाटील प्रकरणात पोलिसांनी घेतले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
अर्थसंकल्पापूर्वीच घोषणांतून लोकप्रियतेवर भर ! 

सांगली / प्रतिनिधी : गेल्या काही महिन्यात इंधनाचे दर जोरदार भडकले आहेत. वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याच्या दरात 30 ते 50 टक्के इतकी वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे स्वप्नातील घर महाग होणार आहे. आधी नोटबंदी त्यानंतर दोन वर्षांनी सांगलीला बसलेला महापुरचा तडाखा पाठोपाठ सलग दोन वर्षे कोरोनाचा दणका यामुळे बांधकाम क्षेत्र डबघाईला आले होते.
गतवर्षी राज्य शासनाने मुद्रांक शुल्कात 50 टक्के सवलत देऊन केवळ तीन टक्क शुल्क आकारणी केल्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यवहार झाले होते. मात्र, त्यानंतर यावर्षी पुन्हा कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमुळे बांधकाम क्षेत्र अडचणीत आले. दसर्‍याच्या दरम्यान बांधकाम व्यवसायाला दिलासा मिळाला असल्याचे चित्र असताना बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने घरे महागण्याची चिन्हे तयार झाले आहेत.
पेट्रोल आणि डिझेलने प्रति लिटल शंभर रुपयांचा आकडा पार केला आहे. इंधनाच्या दरात झालेल्या भरमसाठ दरवाढीमुळे बांधकाम साहित्याच्या वाहतूक खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकाम साहित्याचे दर 30 ते 50 टक्के इतके वाढले आहेत. सध्याच्या महागाईमुळे भविष्यात तयार होणारी घरे 35 ते 40 टक्के वाढीव दराने विक्री होतील, असे दिसत आहे.
एकीकडे शासन परवडणार्‍या दरात घरे उपलब्ध करून देण्याची घोषणा करते तर दुसरीकडे बांधकाम साहित्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मोठ्या प्रकल्पांवर याचा परिणाम होत आहे. त्यामुळे घरांचे दर प्रति चौरस फूट अडीचशे ते तीनशे रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या चार महिन्यांत बांधकाम साहित्याची मोठ्या प्रमाणात दरवाढ झाली आहे. सिमेंटचे दर शंभर ते दीडशे रुपयांनी वाढले आहेत. स्टीलचे दर 40 रुपयांवरून 65 रुपयांवर गेले आहेत, अ‍ॅल्युमिनियमचे दर 250 रुपये प्रति किलो वरून सुमारे 350 रुपये पर्यंत वाढले आहेत. याशिवाय वीट, वाळू, खडी यांच्या दरातही 30 ते 50 टक्के वाढ झाली आहे. पाईपलाईन व इलेक्ट्रिक फिटिंग साहित्याचेही दर वाढले असल्याचे बांधकाम व्यावसायिक सांगतात. डिसेंबर ते जानेवारीनंतर तयार असलेल्या घरांच्या किमती 35 ते 40 टक्के वाढतील, असा अंदाज बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ यांनी व्यक्त केला आहे.
इंधनाच्या दरात वाढ झाल्याने बांधकाम साहित्याचे दर भडकले आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांवर परिणाम होत आहे. तसेच नवीन सुरु होत असलेले प्रकल्प महाग होणार आहेत. त्यामुळे घरांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती केडाईचे अध्यक्ष रवींद्र खिलारे यांनी व्यक्त केली आहे.

COMMENTS