वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा पर्दाफाश झाला आहे. वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प गेल्

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सुरक्षेचा पर्दाफाश झाला आहे. वॉशिंग्टन पोस्टमधील एका वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प गेल्या महिन्यात ‘एअर फोर्स वन’ ऐवजी एका गुप्त लष्करी विमानातून तुर्कस्तानमधून अमेरिकेकडे रवाना झाले होते. इराणकडून आलेल्या हत्येच्या धमकीनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ त्या घटनेचा असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी व्हाईट हाऊसने अशी माहिती दिली होती की राष्ट्रपती त्यांच्या अधिकृत विमानाने उड्डाण करत होते. परंतु प्रत्यक्षात त्यांना चकमा देण्याची रणनीती म्हणून दुसऱ्या विमानात हलविण्यात आले. नाटो परिषदेत सहभागी होण्यासाठी ट्रम्प अंकारा (तुर्की) येथे गेले होते. यासाठी त्यांनी कतारचे नवे आणि नुकतेच अपडेट केलेले जेट वापरले. त्याच्या परतीच्या वेळी, सुरक्षा चिंता आणि इराणशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याने दुसरे विमान वापरण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया ॲपवर लिहिले की, जुन्या आठवणींसाठी ते जुन्या एअरफोर्स वन विमानात प्रवास करत आहेत. दरम्यान, इराण युद्ध सुरू असताना ट्रम्प तुर्की दौऱ्यावर होते. याच दरम्यान त्यांना इराणकडून जीवाला धोका असल्याचे कळले. यानंतरच त्यांनी सर्वांना चकवा देऊन अमेरिका गाठले होते. सुरुवातीला ट्रम्प अमेरिकेच्या विमानात बसले. जाताना त्यांनी सर्वांना हातही दाखवला जेणेकरून ते याच विमानातून प्रवास करत आहेत असा भास होईल. एका दाराने आत गेले आणि दुसऱ्या दारावर एक केटरिंग कंटेनर उंच करून अगदी दाराला लागून ठेवण्यात आलेला. याच कंटेनरमध्ये ट्रम्प कुणालाही कळू न देता लपले. कंटेनर एका ट्रकवर लादण्यात आला आणि त्यानंतर ट्रकमधून प्रवास करताना दुसऱ्या विमानातून त्यांनी तुर्कीतून सुखरूप पलायन केले. प्रवासात असलेले पत्रकार आणि व्हाईट हाऊसच्या अनेक कर्मचाऱ्यांचा असा विश्वास होता की राष्ट्राध्यक्ष जुन्या एअर फोर्स वन विमानात आहेत. पत्रकारांना संपूर्ण विमानप्रवासात खिडकीचे पडदे बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. नंतर जेव्हा ट्रम्प यांना याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी गंमतीने म्हटले, “हा एक धोकादायक प्रवास ठरू शकला असता, आणि जर मला काही झाले असते, तर तुम्ही विमानात असता. ट्रम्प एका गुप्त विमानाने यूकेमधील आरएएफ मिल्डेनहॉल येथे सुरक्षितपणे पोहोचले. काही मिनिटांनंतर, माध्यमांना घेऊन जाणारे जुने एअर फोर्स वन विमान तिथे उतरले. त्यानंतर ट्रम्प आपल्या मुख्य विमानात परतले आणि तिथे तैनात असलेल्या अमेरिकी सैनिकांची भेट घेतली. दरम्यान, असे घडण्याची ही पहिली वेळ नाही. तर 2000 साली, राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पाकिस्तान दौऱ्यादरम्यान त्यांची फसवणूक करण्यासाठी अशाच एका बनावट एअर फोर्स वन विमानाचा वापर करण्यात आला होता.

COMMENTS