Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुष्ठधाम सोसायटीत फराळाचे साहित्य वाटप

लातूर प्रतिनिधी - लातूर येथील सारोळा रोड वरील महात्मा गांधी कृष्ठधाम सोसायटीत राहणा-या गोरगरीब लोकांना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निम

किनवट कृषी उत्पन्न बाजार समितीत राजकीय नाट्य! अविश्वास प्रस्तावाला उच्च न्यायालयाची स्थगिती मिळताच १४ संचालकांचे सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र?
हिंगोलीगेट फुल मार्केटमध्ये दुर्गंधीयुक्त कचर्‍याचे साम्राज्य; फुलविक्रेत्यांचा महापालिकेविरोधात संताप
निश्चित ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमात सातत्य आवश्यक-पोलीस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे

लातूर प्रतिनिधी – लातूर येथील सारोळा रोड वरील महात्मा गांधी कृष्ठधाम सोसायटीत राहणा-या गोरगरीब लोकांना लोकनेते विलासराव देशमुख यांच्या जयंती निमित्ताने लातूर जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव यांच्या वतीने 100 कुटुंबांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अ‍ॅड. प्रमोद जाधव, जिल्हा बँकेचे संचालक पृथ्वीराज शिरसाठ, काँग्रेस माध्यम सेलचे जिल्हाध्यक्ष हरिराम कुलकर्णी, नारायण आंबेकर, प्रा. शशिकांत कदम यांच्या हस्ते गोरगरीब लोकांना फराळाचे साहित्य वाटप करण्यात आले.
लोकनेते विलासराव देशमुख यांनी या भागातील कृष्ठधाम मधील लोकांना वेळोवेळी सहकार्य केले आहे. त्यातील अनेक जणांनी आम्हाला इथ खूप मोठा आधार देण्याचे काम तत्कालीन मुख्यमंत्री लोकनेते विलासराव देशमुख यांनी केले आहे. आज त्यांची आठवण येते असेही ते यावेळी म्हणत साहेबांच्या आठवणींना उजाळा दिला.

COMMENTS