Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

निश्चित ध्येय प्राप्तीसाठी परिश्रमात सातत्य आवश्यक-पोलीस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे

लातूर प्रतिनिधी - विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये निश्चित ध्येय ठरविले पाहिजे आणि ठरविलेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेऊन त्

मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर
मध्य रेल्वेच्या 7 अधिकार्‍यांना ‘अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार’
माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतले भगवान परशुरामाचे दर्शन

लातूर प्रतिनिधी – विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय जीवनामध्ये निश्चित ध्येय ठरविले पाहिजे आणि ठरविलेल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोर परिश्रम घेऊन त्यामध्ये सातत्य ठेवले पाहिजे असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे यांनी केले. श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्था, लातूर द्वारा संचलित महात्मा बसवेश्वर महाविद्यालय, लातूर आणि विद्यार्थी परिषद 2022-23 यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन-मुक्तीसंग्राम पर्व 2023 समारोप आणि बक्षीस वितरण समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे संचालक शिवशंकरप्पा खानापूरे हे होते तर विचारमंचावर संस्थेचे सचिव मन्मथप्पा लोखंडे, प्रमुख अतिथी अजित रॉय तोगरे, सुप्रसिध्द कवी योगिराज माने, भारत सरकार माजी कामगार सहाय्यक आयुक्त विजयकुमार तोगरे, संस्थेचे संचालक अ‍ॅड.श्रीकांतप्पा उटगे, संचालक अ‍ॅड.काशिनाथ साखरे, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने, उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे, प्रभारी प्राध्यापक डॉ.बाळासाहेब गोडबोले, उपप्राचार्य प्रा.बालाजी जाधव, उपप्राचार्य प्रा.संजय पवार, पर्यवेक्षक प्रा.शिवशरण हावळे, विद्यार्थी परिषद सचिव गणेश चव्हाण, विद्यार्थी परिषद अध्यक्षा प्रतीक्षा चापोलीकर, विद्यार्थिनी प्रतिनिधी शिल्पा शिरसाट, वैष्णवी राजपूत, मिताली आगलावे आदींची उपस्थिती होती.

यावेळी संगीत विभागातील प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.गोविंद पवार आणि विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. पूढे बोलताना डॉ.सोमय मुंडे म्हणाले की, भारत देश हा तरुणांचा देश आहे. लातूर हे शैक्षणिक हब आहे. आपल्या जीवनात आपल्याला यशस्वी व्हायचे असेल तर रात्रंदिवस चिकाटीने अभ्यास केला पाहिजे. आपले कार्य आपण आपल्या कर्तव्य भावनेने केले पाहिजे. आपल्या कुटुंबीयांना, मित्राला आणि सामाजिक जीवनाला आपण वेळ दिला पाहिजे. आपल्या वरिष्ठांचे सातत्याने मार्गदर्शन घेतले पाहिजे. आयुष्यामध्ये समाजासाठी काम करावे यासाठीच मी भारतीय लोक सेवामध्ये कार्य करायचे ठरविले. त्यामध्ये मी यशस्वी सुद्धा झालो आहे. यशस्वी जीवनासाठी ध्येय निवड आणि त्याची प्राप्ती ही अत्यंत महत्त्वाची असते असेही ते म्हणाले यावेळी मार्गदर्शन करताना अजित तोगरे म्हणाले की, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे आपण ग्रामीण भागातील आहोत ही भावना बाजूला सारून आपण सातत्याने प्रयत्नशील असले पाहिजे. सर्वांकडून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजे आणि आलेल्या संधीचे सोने करून त्यामध्ये यश प्राप्ती केली पाहिजे. आपण आपल्या यशस्वी जीवनासाठी आपले कुटुंब, गाव, जिल्हा सोडून बाहेर ठिकाणी गेले पाहिजे. आपल्या देशासाठी आपण कार्य केले पाहिजे कारण आपल्या कार्यामुळेच देश हा समृद्ध बनू शकतो त्यामुळे आपण सातत्याने चिकाटी, जिद्द आणि कठोर परिश्रम यातून आपले निश्चित उद्दिष्टे प्रामाणिकपणे कार्य करून साध्य केले पाहिजे असे ते म्हणाले. यावेळी विजयकुमार तोगरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी सुप्रसिद्ध कवी योगीराज माने यांनी विद्यार्थ्यांना विविध कवितेच्या माध्यमातून मौलिक संदेश दिला यामध्ये ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनो तुम्ही मोबाईलपेक्षा आपल्या आई-वडिलांच्या संपर्कामध्ये अधिक रहायला पाहिजे त्यांना वृद्धाश्रमामध्ये पाठवू नका असे सांगून कवी हा डोळस असतो. कवितेमुळे प्रत्येकाच्या जीवनाला एक वेगळे वळण मिळते असे सांगून बाप माझा, लेक माझा, लव स्टोरी, सीमेवरती जाऊ शत्रूला हीसका दावू अशा विविध प्रकारच्या मार्मिक कविता त्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाचा अध्यक्क्षीय समारोप करताना संचालक शिवशंकरप्पा खानापुरे म्हणाले की, वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आनंद उत्सवाचा वातावरण निर्माण होते. विविध कलागुणांच्या सादरीकरणातून विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढते आणि त्यामुळे जीवनामध्ये आशादायी वातावरण निर्माण होते असे सांगून वार्षिक स्नेहसंमेलनातील प्रत्येक उपक्रमात आपण सहभागी होऊन त्याचा आनंद घ्यावा असेही ते म्हणाले. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रभारी प्राचार्य डॉ.दिनेश मौने म्हणाले की, आज वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये गुणवंत प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला आहे यामध्ये महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाशी ज्यांनी सातत्याने संपर्क ठेवला आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचाराची प्रत्यक्ष जीवनामध्ये अंमलबजावणी केली आणि आपल्या मुलांना उच्चस्थ पदावर जाण्यासाठी सहकार्य केले असे विजयकुमार तोगरे आणि त्यांचे चिरंजीव अजित तोगरे आणि ज्यांनी आपल्या कार्य कर्तृत्वातून महाराष्ट्रामध्ये गडचिरोली सारख्या दुर्गम भागामध्ये नक्षलवाद्यांना कंठस्थानी पाठवले आणि त्यामुळे त्यांना कमी वयामध्ये शौर्य पदक प्राप्त झाले असे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक डॉ.सोमय मुंडे या प्रमुख अतिथींना कार्यक्रमांमध्ये बोलाविले आहे यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भविष्यात आपणही आपल्या शैक्षणिक कार्याच्या माध्यमातून उच्च पदावर गेले पाहिजे ही भावना निर्माण होईल असे सांगून पुढील सर्व कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असेही ते म्हणाले. यावेळी प्रमुख अतिथींचा परिचय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.राजकुमार लखादिवे यांनी करून दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.रत्नाकर बेडगे, प्रा.सुरेंद्र स्वामी, ऋतुजा भिसे, साक्षी घोडके यांनी केले तर प्रभारी प्राध्यापक डॉ.बाळासाहेब गोडबोले यांनी वार्षिक स्नेहसंमेलन यशस्वीतेसाठी श्री महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्य, विभागप्रमुख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, सर्व समित्याचे समन्वय, सदस्य, संगीत विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि सहभागी विद्यार्थ्यांचे आभार मानले. यावेळी राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, संगीत विभाग, समाजकार्य विभाग आणि क्रीडा विभागातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजन समितीतील सदस्य डॉ.संजय गवई, डॉ.यशवंत वळवी, डॉ.नल्ला भास्कर रेड्डी, डॉ.रत्नाकर बेडगे, डॉ.विजयकुमार सोनी, डॉ.शिवप्रसाद डोंगरे, डॉ.दीपक चाटे, डॉ.जितेंद्र देशमुख, प्रा.विजयकुमार धायगुडे, प्रा.विश्वनाथ स्वामी, प्रा.काशिनाथ पवार, डॉ.आनंद शेवाळे, प्रा.रमेश तडवी, डॉ.सुजित हंडीबाग, डॉ.मनोहर चपळे, डॉ.मंतोष स्वामी, डॉ.विनायक वाघमारे, प्रा.धोंडीबा भूरे, डॉ.शीतल येरुळे, प्रा.गोविंद पवार यांच्यासह विविध समितीतील समन्वयक आणि सदस्यांनी परिश्रम घेतले.  

COMMENTS