Homeताज्या बातम्या

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही – उद्धव बापू मडके यांची ग्वाही

गेवराई: उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना संपर्कप्रमुख मनोजदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखा

देवळाली प्रवरात भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत २६ वर्षीय तरुण ठार
लोकशाही मार्गाने आंदोलन करणार्‍यांवरील गुन्हे मागे घ्या; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने
सात वर्षांच्या दुरवस्थेला ग्रामस्थांचा संताप; टोकवाडी-गडदेवाडी मार्गावर दोन तास रास्ता रोको जीवघेण्या रस्त्याविरोधात शाळकरी विद्यार्थ्यांचाही सहभाग; आठ दिवसांत डागडुजीचे लेखी आश्वासन, अन्यथा आमरण आंदोलनाचा इशारा

गेवराई: उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार आणि शिवसेना संपर्कप्रमुख मनोजदादा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गेवराई तालुक्यात शासनाच्या लोककल्याणकारी योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम सुरू आहे. याच उपक्रमांतर्गत आगरनांदूर येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील पात्र लाभार्थ्यांना मंजुरी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव बापू मडके यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. यामध्ये गीता श्रीमंत कोकरे, बबती त्र्यंबक आरेकर, नानीबाई आण्णा आरेकर, अहिल्याबाई कल्याण कोकरे, कांताबाई शिवाजी कोकरे, सविता रंजित कोकरे, छबुबाई सुदाम जाधव, शांताबाई तात्याराव मोटे, सुरेखा चव्हाण (ताकडगाव) आणि शशिकला जयसिंग टकले यांचा समावेश होता. यावेळी लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनेचा लाभ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करत शिवसेनेच्या पाठपुराव्याचे कौतुक केले. प्रसंगी बोलताना उद्धव बापू मडके म्हणाले, शासनाच्या कोणत्याही कल्याणकारी योजनेपासून एकही पात्र नागरिक वंचित राहू नये, हा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा संकल्प आहे. गेवराई तालुक्यातील निराधार, विधवा, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि गरजू नागरिकांना त्यांच्या हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी शिवसेना सातत्याने प्रयत्नशील आहे. प्रत्येक गावात जाऊन पात्र लाभार्थ्यांचे प्रस्ताव तयार करून त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल. यावेळी संजय गांधी निराधार अनुदान समितीच्या सदस्या शंकूताई घुंगासे, चंद्रकला मुळे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आगरनांदूर परिसरातील गरजू नागरिकांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जनजागृती, मार्गदर्शन व पाठपुरावा अभियान अधिक व्यापकपणे राबविण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

COMMENTS