Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अगस्ती महाविद्यालयात राबविला स्वच्छता उपक्रम

अकोले/प्रतिनिधी ः अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयात रविवारी 1 ऑक्टोबर 23 रोजी ’स्वच्छता ही सेवा’ उपक्रम परिसर स्वच्छता

लोकशाही रक्षणाची जबाबदारी सांगणारे साहित्य संमेलन ः रतनलाल सोनाग्रा
बोठेशी संबंधित ‘त्या’ फोनचा फॉरेन्सिक अहवाल प्रतीक्षेत
सत्ताधारी ओबीसी नेत्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार l पहा LokNews24

अकोले/प्रतिनिधी ः अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालयात रविवारी 1 ऑक्टोबर 23 रोजी ’स्वच्छता ही सेवा’ उपक्रम परिसर स्वच्छता मोहिमेअंतर्गत घेण्यात आला. महाविद्यालयातील परिसर आणि भोवतालच्या परिसरात महाविद्यालयातील प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी तसेच राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी यांनी श्रमदान-स्वच्छता मोहीम राबविली . स्वच्छ भारत मोहिमेअंतर्गत स्वच्छता जागृती फेरीचे आयोजन करण्यात आले . अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, एन्. सी. सी. प्रमुख प्रा. सचिन पलांडे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी गांधी जयंतीच्या, स्वच्छ भारत मोहीम पार्श्‍वभूमीवर प्रभावीपणे स्वच्छता मोहिमेला प्रतिसाद दिला. ग्रंथालय परिसर, प्रशासकीय भवन, विज्ञान इमारतीसह खेळाची मैदाने आणि अन्य परिसरात मोहीम संपन्न झाली.

COMMENTS