Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राहुरी तालुका व्यापारी सह. पतसंस्थेला 16 लाखाचा नफा ः प्रकाश पारेख

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुका व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा ताळेबंद संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश पारख यांचे हस्ते करण्यात आला. पतसंस्थेन

सोमनाथ जंगम यांचा डॉक्टर ऑफ सोशल वर्क किताबाने सन्मान
एकलहरे दरोड्यात पत्नीनेच केला पतीची गळा आवळून खून
श्री सप्तशृंगी पालखी सोहळ्याचे व रामकथेचे आयोजन

राहुरी/प्रतिनिधी ः राहुरी तालुका व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचा ताळेबंद संस्थेचे संस्थापक चेअरमन प्रकाश पारख यांचे हस्ते करण्यात आला. पतसंस्थेने सुरूवातीपासूनच  सभासदांना 11 टक्के डिव्हीडंड दिलेला आहे. काटेकोर कर्ज वाटप व वसुलीचे कडक धोरण अवलंबून संस्थेच्या प्रगतीचा वाढता आलेख ठेवला आहे. संस्थेकडे अखेर 12.92 कोटीच्या ठेवी असून कर्ज वितरण 10.09 कोटीचे करण्यात आलेले असून 4.5 कोटीची गुंतवणूक करण्यात आलेली आहे, सर्व निधीची 80 लाख रुपये गुंवणुक केलेली आहे.
संस्थेची कर्ज वसुली उत्तम असुन एन.पी.ए. शुन्य टक्के आहे. तसेच संस्थेला सन 2022 2023 सालात रुपये 69.79 लाख झालेला असुन सर्व तरतुदी करुन ताळेबंदास रुपये 16.89 लाख शिल्लक ठेवेला आहे, अशी माहिती संस्थापक चेअरमन प्रकाश पारख यांनी दिली. संस्था रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करीत असुन संस्थेच्या ग्रामिण भागात नवीन शाखा शुभारंभ करुन ग्रामीण भागातील लहानमोठया व्यावसायीकांना सेवा देण्याचा मानस संस्थेचे व्हा. चेअरमन प्रल्हाददास राठी यांनी व्यक्त केला आहे. व त्या दृष्टीने संस्थेने कार्यवाही चालु केलेली आहे. राहुरी तालुक्यातील व्यापारी तत्वावर चालु झालेली लहानशी संस्था सभासद व सर्व हितचिंतक व्यापारी यांचे सहकार्याने भरभराटीस आलेली आहे. संस्थेला शुभारंभापासुनच लेखापरीक्षण वर्ग अ मिळालेला आहे. संस्थेने दर वर्षी सभासदांना 11 टक्के डिव्हीडंड दिलेला आहे. संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षात 25 कोटी ठेवीचे उद्दीष्ट समोर ठेवण्यात आलेले असून राहुरी तालुक्यातील शेतकरी, कष्टकरी, लहान मोठे व्यापारी यांचे सहकार्यने ते लवकरच साध्य होईल अशी अशा चेअरमन व व्हा. चेअरमन यांनी व्यक्त केली. तसेच गांवागांवामधून दैनिक बचत ठेव प्रतीतिधीची नेमणूक करुन सुशिक्षीत तरुणांना व्यवसायाची संधी उपलब्ध करुन देणेचे ध्येय ठेवणेत आलेले आहे. संस्थेचे प्रगतीसाठी संस्थेचे संचालक पारसमल राका, आनंद पारख रमण वाघ, विजय आळपे, विक्रम चव्हाण, नशीर भाई शेख, नवनाथ शेडे, छाया दुगड, रजनी शेजुळ प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी तात्यासाहेब गायकवाड व्यवस्थापक मिलिंद सातभाई, हबीब सय्यद, सविता करपे इत्यादी हजर होते. पुढील वर्षी सभासदांना 15 टक्के डिव्हीडंड देण्याचा मानस यावेळी प्रकाश पारख यांनी व्यक्त केला. सर्व सभासद कर्जदार, खातेदार, हितचिंतक यांचे संस्थापक चेअरमन यांनी अभार मानले

COMMENTS