Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपचे हिंदूत्व गोमूत्रधारी – उद्धव ठाकरेंची टीका

मंत्री चंद्रकांत पाटलांची हकालपट्टी करण्याची मागणी

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी बाबरी पडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता असे वक्तव्य करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर

राज्यातील जनतेला फसवण्याचा धंदा उद्धव ठाकरेंनी सुरू केला आहे काय…? (Video)
वर्ष सरता-सरता सरकारही जाईल ः उद्धव ठाकरे
अधिक चांगला वृद्धाश्रम असेल, तर राज्यपाल कोश्यारी यांना तिकडे पाठवा 

मुंबई/प्रतिनिधी ः भाजप नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी बाबरी पडली तेव्हा एकही शिवसैनिक नव्हता असे वक्तव्य करून, नव्या वादाला तोंड फोडले आहे. यावर ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपचे हिंदूत्व केवळ गोमुत्रधारी धारी असून, शिंपडत्त आणि स्वच्छ करा, एवढ्यापुरतेच मर्यादित असल्याची जहरी टीका केली आहे. शिवाय मंत्री चंद्रकांत पाटील यांची हकालपट्टी करा, अन्यथा एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली. उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, तेव्हा बाळासाहेबांनी जबाबदारी स्वीकारली. बाळासाहेब म्हणाले हे कसले नपुंसक नेतृत्व. आता एक-एक जण बिळातून बाहेर येतायत. आमचे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे. भाजपकडे कधीच शौर्य नव्हते. मुंबई दंगलीवेळी, पण शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये, अशी मागणी त्यांनी केली. उद्धव ठाकरे म्हणाले की, मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो, पण पंतप्रधानांची हिंमत झाली नाही. शेवटी कोर्टाने निकाल दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे, शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही. त्यांनी बाळासाहेबांचा फोटो पण वापरू नये, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, अयोध्येतील कारसेवकांच्या सोयीसाठी बजरंग दलाने मला तिथे ठेवले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ताकद आमच्या पाठिशी होती. मात्र, ते यात उघडपणे सहभागी नव्हते. त्यांनी समविचारी संघटनांना हे काम वाटून दिले होते. संजय राऊत बाबरी मशीद पाडल्याबद्दल बोलतात. मात्र, ते त्यावेळी अयोध्येत तर होते का?, असा सवालही त्यांनी केला. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेतही पाटील यांनी बाबरी पाडण्याचा प्लॅन शिवसेना भवनात झाला नसल्याचा दावा केला.

बाबरी पाडण्यात एकही शिवसैनिक नव्हताः मंत्री चंद्रकांत पाटील – बाबरी पाडण्यात एकाही शिवसैनिकाचा हात नव्हता, असे वक्तव्य भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. चंद्रकांत पाटील यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात ते म्हणाले की, 6 डिसेंबर 1992 रोजी बजरंग दल, विश्‍व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीने बाबरी मशीद पाडली. बाबरी मशिदीचा ढाचा शिवसैनिकांनी पाडला नाही. ती कारसेवकांनी पाडली. बाबरी पाडल्यानंतर बाळासाहेब ठाकरे जबाबदारी घेतो म्हणाले. म्हणजे काय? त्यांनी चार सरदार तरी पाठवले का, असा सवालही त्यांनी या मुलाखतीत केला.

COMMENTS