राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे

Homeशहरंअहमदनगर

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा सचिवपदी नितीन खंडागळे

नगर - प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी नितीन रमेश खंडागळे यांना आमदार संग्रामभैय्या जगताप या

गुंड गजा मारणेच्या पत्नीला राष्ट्रवादीची उमेदवारी
हवाई सुरक्षेच्या नव्या नियमांवर रोहित पवारांची टीका
बारामती पोटनिवडणुकीत आता पेच वाढला…

नगर – प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अहमदनगर जिल्हा सचिवपदी नितीन रमेश खंडागळे यांना आमदार संग्रामभैय्या जगताप यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. 

याप्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष  शाबीरअली सय्यद, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष सय्यद गालिबअली, नगरसेवक संपत बारस्कर, राष्ट्रवादी सावेडी विभागप्रमुख सतीष मुंडलिक, उद्योजक विशाल गायकवाड, नगर तालुका उपाध्यक्ष आबासाहेब गुंड, उद्योजक विपुल  वाखुरे, पै.मच्छिंद्र साबळे, पै.वैभव भुतकर, मंदार लष्कर, संकेत पवार, सिद्धांत ससाणे, बादल बोराडे व पदाधिकारी उपस्थित होते.

     याप्रसंगी आ.संग्राम जगताप म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कार्यकर्ते नेहमीच प्रयत्नशील असतात. मिळालेल्या पदाच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा. त्याचप्रमाणे राज्य सरकारच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम पदाधिकार्‍यांनी करावे. नितीन खंडागळे हे नेहमीच पक्षीय, सामाजिक कार्यात पुढाकार घेत असतात, आता पदाच्या माध्यमातून अल्पसंख्याक समाजाचे प्रश्न सोडवून पक्ष वाढीचे कार्य करतील, असा विश्वास व्यक्त केला.

     नियुक्तीनंतर नितीन खंडागळे म्हणाले, पक्षीय काम करत असतांना वरिष्ठांनी आपल्यावर जी जबाबदारी दिली. ते यशस्वीपणे पार पाडू. अल्पसंख्याक विभागाचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील. आ.संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचे संघटन मजबूत करु, असे सांगून आभार मानले.

COMMENTS