Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मांडूळ तस्करीचा पर्दाफाश; तिघांकडून जिवंत मांडूळ हस्तगत

शिरवळ / वार्ताहर : वनविभाग व फिरत्या पथकाने बुधवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिरवळ (ता. खंडाळा) येथे जिवंत मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्य

महिला वकिल यांच्यावर बलात्काराचा प्रयत्न
पावसाने उघडीप दिल्याने दिवाळीनिमित्त पालकमंत्र्यांचे शेतकर्‍यांच्या बांधावर दौरे
महाबळेश्‍वर-पाचगणीच्या पर्यटन मास्टर प्लॅनला मंजूरी द्या : खा. श्रीनिवास पाटील यांची लोकसभेत जोरदार मागणी

शिरवळ / वार्ताहर : वनविभाग व फिरत्या पथकाने बुधवारी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून शिरवळ (ता. खंडाळा) येथे जिवंत मांडुळाची विक्री करण्यासाठी आलेल्या तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून जिवंत मांडूळ साप (इंडियन सॅण्ड बोआ) हस्तगत करण्यात आले आहे. रवींद्र महादेव कंगाळे (वय 42, रा. श्रीराम नगर, शिरवळ), अनिकेत तात्यासाहेब यादव (वय 24, रा. कवठे, मसूर), संतोष दीनानाथ काटे (वय 42, रा. भांबे, उंब्रज) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी 19 रोजी मानद वन्यजीव रक्षक तथा वन्यजीव अपराध नियंत्रण बुरो सदस्य रोहन भाटे यांना काही लोकांनी जिवंत मांडूळ जातीचे साप विक्रीसाठी पकडले. ते विक्री करणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. तसे छायाचित्रीकरण भाटे यांना मिळाले होते. भाटे यांनी तत्काळ वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे यांना माहिती दिली. या माहितीवरून शिरवळ-लोणंद रोडवरील पशुवैद्यकीय कॉलेज परिसरात संशयित मांडुळ विक्रीसाठी येणार असल्याचे समजल्याने सापळा रचण्यात आला.
सायंकाळी 5 वाजता हीरो होंडा पॅशन मोटार सायकलवरून तीन संशयित तेथे आले. ते संशयास्पदरित्या घुटमळत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना झडप घालून ताब्यात घेऊन तपासणी करण्यात आली. त्यावेळी त्यांच्याकडे जिवंत मांडूळ साप मिळून आला. तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली. गुह्यात वापरलेली एक दुचाकी मोटारसायकल, तीन मोबाईल संच व एक जिवंत वन्यजीव साप हस्तगत केले.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखालील कारवाईत वनक्षेत्रपाल सचिन डोंबाळे, महेश पाटील, वनपाल दीपक गायकवाड, राहुल जगताप, वनरक्षक विजय भोसले, आनंदा जगताप, कॉन्स्टेबल सुहास पवार, दिनेश नेहरकर सहभागी झाले होते. पुढील पंचनामा व गुन्हा नोंद करणे प्रक्रिया वनक्षेत्रपाल (खंडाळा) महेश पाटील यांच्या कार्यालयात सुरू आहे. वन्यजीव अधिनियम 1972 नुसार सदर मांडूळ साप हा शेड्यूल्ड चारमध्ये येतो. मांडुळाची लांबी 141 से. मी. व 2 किलो 300 ग्रॅम वजन आहे.

COMMENTS