Homeताज्या बातम्यामनोरंजन

दीपिका पादुकोणने घेतलं तिरुपती बालाजीचं दर्शन

सध्या सेलिब्रिटी आणि देवदर्शन हे यमक जुळलेले दिसत आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता.आता काल पुन्हा शाहरुख शिर्

दीपिका पादुकोणचे नव्या व्यवसायात पदार्पण
दीपिका पादुकोण ‘पठाण’ च्या कामात व्यग्र
रणवीर सिंह होणार शाहरूखचा शेजारी.

सध्या सेलिब्रिटी आणि देवदर्शन हे यमक जुळलेले दिसत आहे. काही दिवसांपुर्वी शाहरुख खान वैष्णो देवीच्या दर्शनाला गेला होता.आता काल पुन्हा शाहरुख शिर्डीच्या साई बाबांच्या दर्शनाला गेला होता. आता बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही देव दर्शनाला पोहचली आहे. दीपिका पदुकोण सध्या तिच्या आगामी ‘फायटर’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी दीपिका तिच्या बहिणीसह भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहचली. दिपिकाचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. दीपिकाने तिची बहीण अनिशासोबत गुरुवारी संध्याकाळी तिरुमलाला येथील भगवान वेंकटेश्वराचे आशीर्वाद घेतले. यावेळी तिने काळ्या रंगाचा को-ऑर्डर सेट घातला होता. सध्या दीपिकाचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

COMMENTS