Homeताज्या बातम्यासंपादकीय

पठाणी धोबीपछाड ! 

  पठाण चित्रपटाने खरेतर कमालच केली म्हणायचं. सत्ताधारी आणि त्यांची सांस्कृतिक चळवळ यांचा संपूर्ण विरोध असतानाही या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्

मतांच्या ध्रुवीकरणासाठी राजकीय संदोपसुंदी
वल्गनाकार आठवले ! 
मुंबईतील महामोर्चा !

  पठाण चित्रपटाने खरेतर कमालच केली म्हणायचं. सत्ताधारी आणि त्यांची सांस्कृतिक चळवळ यांचा संपूर्ण विरोध असतानाही या चित्रपटाने भारतीय प्रेक्षकांच्या खिशातून अवघ्या पाच दिवसांत तीनशे कोटी गोळा केले; तर आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांच्या खिशातून देखील  दोनशे कोटींचा गल्ला जमवून एकंदरीत पाचशे कोटींचा व्यवसाय अवघ्या पाच दिवसांत केला. इतक्या कमी दिवसांत एवढा गल्ला जमवणारा ‘पठाण’ हा एकमात्र चित्रपट ठरल्याने याची चर्चा होणे स्वाभाविक आहे. खरेतर, हिंदी सिनेसृष्टीत  जागतिक दर्जा गाठणारी निर्मिती अद्यापही यायची आहे. अधूनमधून ऑस्कर पर्यंत अमूक चित्रपट जाणार म्हणून चर्चा जरूर झडतात; परंतु, सरतेशेवटी ओम फस स्वाहाच होते. याचे मुख्य कारण हिंदी किंवा भारतीय सिनेसृष्टीत माणसाच्या जगण्याच्या विषयांना कधी हातच घातला जात नाही.

नाही म्हणायला मराठी सिनेमात काही प्रयोग जरूर होताहेत. परंतु, तेदेखील ग्रामीण जीवनाचे अर्धवट विषय कलात्मक पातळीवर सादर करण्यातून. अशा पार्श्वभूमीवर ‘पठाण’ च्या यशाचे गमक काय? यावर जरूर विचार करण्यास बाध्य व्हावे लागते. दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टी तंत्राच्या बाबतीत पाश्चिमात्य पध्दतीने निर्मिती करते. त्यामुळे बाहुबली सारखे अवाढव्य बजेटचे चित्रपट ते निर्माण करतात. प्रत्यक्षात मात्र या चित्रपटाच्या कमाईला देखील मागे टाकले. ते देखील अवघ्या तीन दिवसांत. प्रचंड विरोध, सांस्कृतिक उन्मत्तपणा आणि एखाद्या कलाकाराला व्यक्ती म्हणून दुय्यम लेखत धर्माच्या आधारावर त्याची छळवणूक उभी करणे या सर्व बाबी शाहरुख खान या अभिनेत्याविरोधात वापरल्या जाऊन देखील ‘पठाण’ चे आर्थिक यश अफलातून आहे. याची कारण मीमांसा  करताना आपल्याला हेच म्हणावे लागेल की, विज्ञानाचा एक नियम आहे म्हणजे एखाद्या वस्तूला जितकी आपण खाली दाबतो की त्यानंतर तितकीच मोठ्या प्रमाणात उसळी घेते.

तसं पाहिलं तर शाहरुख खान याने जवळपास दहा वर्षाच्या गॅप नंतर चित्रपटसृष्टीत नव्या निर्मितीच्या माध्यमातून समोर आला.  यादरम्यान त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले. त्याच्या यशाचा परिणाम त्याच्या मुलांवर देखील झाला. परंतु, या कशालाही न डगमगता त्याने शांतपणे आपला प्रवास सुरू ठेवला. लोकांना शाहरुख खान हा कलाकार म्हणून त्याच्या रोमॅंटीक भूमिकेतून कायमच भावला आहे. त्यांच्या जात-धर्माशी लोकांना काहीच देणेघेणे नव्हते. त्याचवेळी धर्माचा एका टोकाने प्रचार करणाऱ्यांनी शाहरुख च्या फॅन्सना अधिक मुलभूत विचार करण्यास बाध्य केले. त्याचवेळी अरब देशात प्रमुख स्थान असलेल्या दुब‌ईच्या बूर्ज खलिफा वरून शाहरुख च्या चित्रपटाचे प्रमोशन होणे, यातून गल्फ देशांमध्ये कामानिमित्त गेलेल्या भारतीयांनी आपापल्या नातेवाईकांना चित्रपटातला प्रतिसाद देण्याचे संदेश दिले. भारतातील लोकांना देखील धर्मावलंबी आक्रमणाचा वीट आलाय. . या सर्वांचे परिणाम पठाण च्या यशात झाले.

COMMENTS