Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मंत्री छगन भुजबळांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

मुंबई ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी तथा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिक

ओबीसींची दुसर्‍या टप्प्यात स्वतंत्र जनगणनामंत्री भुजबळ : जातीनिहाय जनगणनेचा मार्ग मोकळा
व्यापारी संकुलातील गाळे वाटपाची प्रक्रिया महिनाभरात पूर्ण करावी मंत्री छगन भुजबळ
महाविकास आघाडी आहे… एकमेकांचा सन्मान राखा…

मुंबई ः मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या निर्णयाला ओबीसी तथा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. अज्ञात व्यक्तींनी भुजबळ यांना फोन करुन जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती आहे. हीच बाब लक्षात घेता पोलिसांनी छगन भुजबळ यांच्या शासकीय निवास्थानी अतिरिक्त सुरक्षा वाढवली आहे.
मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन करत उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला राज्यभरातील मराठा बांधवांनी जोरदार प्रतिसाद दिला. जरांगे यांच्या आवाहानानंतर राज्यात ठिकठिकाणी साखळी उपोषणे झाली. काही ठिकाणी आंदोलनाला गालबोट देखील लागले. दरम्यान, राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेऊन लवकरात लवकर आरक्षण देण्यात येईल, असे आश्‍वासन दिले. राज्य सरकारच्या आश्‍वासनानंतर जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. मात्र, सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.

COMMENTS