Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

फलटण तालुक्यातील खाणीत परप्रांतियाचा मृत्यू

प्रकरण दडपण्याचा मालकाकडून प्रयत्नफलटण/ प्रतिनिधी : मौजे काळज येथे खाणीत काम करताना एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. ही घ

*LokNews24 : अंगावर थुंकल्याच्या रागातून ‘त्या’ महिलेचा तरुणाने केला खून l पहा LokNews24*
औंध येथील यमाई देवी तळे परिसर विकासाच्या कामास मुख्यमंत्र्यांची मान्यता
सच्चा गांधीवादी

प्रकरण दडपण्याचा मालकाकडून प्रयत्न
फलटण/ प्रतिनिधी : मौजे काळज येथे खाणीत काम करताना एक परप्रांतीय कामगार गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना अत्यंत गोपनीय पध्दतीने दाबत याबाबत महसूल विभाग व पोलीस विभाग, आरोग्य विभाग यांना हाताशी धरून अपघाती गुन्हा दाखल न करता खाण मालकाने सदरचे प्रकरण दाबले असल्याची तालुक्यात चर्चा सुरू आहे.
याबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी, दि. 3 रोजी सकाळी 12 वाजण्याच्या सुमारास फलटण तालुक्यातील मौजे काळज या ठिकाणी असणार्‍या एका खाणीमध्ये काम करणार्‍या बासू झंपू राठोड (वय 49, रा. विजापूर) हा कामगार खाणीत काम करत असताना डोक्यात दगड पडल्याने तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर या कामगारास खाण मालक व इतरांनी फलटण येथील सरकारी दवाखान्यात 1 वाजण्याच्या सुमारास दाखल केले होते. गंभीर जखमी कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले यानंतर त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. या अपघाताबाबत गुन्हा दाखल न करता मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले असल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत लोणंद व फलटण पोलीस ठाण्यात आजअखेर अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यात आला नाही. फलटण येथील सरकारी दवाखान्यातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची गरज आहे. गंभीर जखमी कामगारास कोणी सरकारी दवाखान्यात दाखल केले. त्यावर कोणत्या डॉक्टरने उपचार केले. मयत कामगाराचे शवविच्छेदन कोणी केले. याबाबत आज अखेर गुन्हा दाखल का करण्यात आला नाही? गुन्हा दाखल न करता शवविच्छेदन कसे करण्यात आले. गुन्हा दाखल न करता अंत्यसंस्कार कसे करण्यात आले. फलटण शहर व लोणंद पोलीस ठाण्यात याबाबत कोणत्या कारणामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. महसूल विभागास 24 तासात अपघाताबाबत अवगत करणे बंधनकारक असताना अवगत का करण्यात आले नाही. अपघात लपवल्याबाबत खाण परवाना रद्द होणार का? सर्व गोष्टीला जबाबदार खाण मालकाविरोधात गुन्हा लपवणे. मृतदेहाची विल्हेवाट लावणे याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का? सदर गुन्हा लपवल्याप्रकरणी जबाबदार डॉक्टर व अधिकारी यांच्यावर कारवाई होणार का?, असे अनेक सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महसूल विभाग, पोलीस विभाग व आरोग्य विभागाबाबत खुलासा करणार का असा सवाल सामान्य जनतेला पडला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

त्या दोन अनाधिकृत खाणी बंद होणार का?
नियमबाह्य पध्दतीने फलटण-सातारा मार्गालगत असलेल्या मौजे नांदल येथील दोन बेकायदेशीर क्रशर जिल्हा मार्ग रस्त्याचे मोजमाप करून खाण बंद करण्याची मागणी या निमित्ताने जोर धरु लागली आहे.

वायकर साहेब फोन उचला.
लोणंद पोलीस ठाण्याचे कारभारी विशाल वायकर यांना काळज येथील घडलेल्या बेकायदेशीर खाणीत घडलेल्या घटनेबाबत माहिती घेण्यासाठी अनेक पत्रकारांनी फोनवरून संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्याची तसदी घेतली नाही. त्यामुळे लोणंद पोलीस ठाण्याच्या कारभार्‍याच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे
.

COMMENTS