Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तामसा-हदगाव राज्यमार्गावर मृत्यूचे तांडव; रस्ते विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलनाचा इशारा

तामसा : तामसा ते हदगाव या राज्य महामार्ग (क्र. 251)वरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग अक्षरशः ‘डे

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
मागासवर्गीयांवरील हल्ल्यांबाबत केज पोलिसांवर निष्क्रियतेचा आरोप; मंगळवारी जनआक्रोश मोर्चा-डॉ.जितेंद्र ओव्हाळ
17 एप्रिल रोजी बीड येथे भव्य एल्गार मोर्चागेवराई तालुक्यातील समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-अलीम सय्यद

तामसा : तामसा ते हदगाव या राज्य महामार्ग (क्र. 251)वरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग अक्षरशः ‘डेथ ट्रॅप’ बनला आहे. या पार्श्वभूमीवर रस्त्यावर तातडीने दुभाजक (डिव्हायडर), सर्व्हिस रोड, गतिरोधक तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
या संदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीं नांदेड जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांना निवेदन सादर करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तामसा-हदगाव मार्गावरील वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, नागरी वस्तीतून जाणार्‍या या रस्त्यावर ना दुभाजक, ना गतिरोधक, ना झेब्रा क्रॉसिंग-अशा प्राथमिक सुविधांचा पूर्णतः अभाव आहे. त्यामुळे वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवत असून, अपघातांची संख्या चिंताजनकरीत्या वाढली आहे. गेल्या वर्षभरात अनेक निष्पाप नागरिकांनी या मार्गावर आपले प्राण गमावले आहेत. यामध्ये एका तरुण व्यापार्‍याचा, बाहेरगावी जाणार्‍या महिलेचा, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तरुणाचा तसेच संतोष राऊलवार या शिवणकाम करणार्‍या कारागिराचा समावेश आहे. वाढत्या मृत्यूंच्या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांनी मागणी केली आहे की, शहरी भागातून जाणार्‍या या रस्त्यावर तातडीने दुभाजक व सर्व्हिस रोड उभारण्यात यावा. तसेच शाळा, चौक व वर्दळीच्या ठिकाणी शास्त्रोक्त पद्धतीने गतिरोधक बसवून, अपघातप्रवण क्षेत्रात साईनबोर्ड, झेब्रा क्रॉसिंग व वेगमर्यादा दर्शवणारे फलक लावावेत. दरम्यान, संबंधित विभागाने तात्काळ कारवाई न केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष ममता अर्जुन जोशी यांनी दिला आहे. या निवेदनावर अनेक मान्यवर व संतप्त नागरिकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

संतप्त नागरिकांच्या आंदोलनाच्या इशार्‍यानंतर तरी प्रशासन या ‘रक्तलांच्छित’ रस्त्याकडे गांभीर्याने लक्ष देणार का? की आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यावरच यंत्रणा जागी होणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

COMMENTS