Homeताज्या बातम्या

स्थापत्य अभियंत्यांना मिळणार महसूल मोजणी सर्वेची कामे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे तातडीने आदेश

मुंबई : महसूल विभागाच्या भूमापन कार्यालयामार्फत करण्यात येणारी मोजणी व सर्वेक्षणाची कामे इच्छुक स्थापत्य अभियंत्यांना (Civil Engineers) उपलब्ध कर

साईनाथ महाराजांच्या समाजसेवेचे महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडून कौतुकलोककल्याणकारी समाजसेवेची नवी जबाबदारी मिळण्याची शक्यता
‘ऑपरेशन टायगर’शी भाजपचा संबंध नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंचे आरोप फेटाळले
नाशिक भूखंड घोटाळा प्रकरणी अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ हिवाळी अधिवेशनातमहसूलमंत्री बावनकुळे ; 13 वर्षांचा ’महसूल घोटाळा’ उघड; 197 जणांवर गुन्हे,

मुंबई : महसूल विभागाच्या भूमापन कार्यालयामार्फत करण्यात येणारी मोजणी व सर्वेक्षणाची कामे इच्छुक स्थापत्य अभियंत्यांना (Civil Engineers) उपलब्ध करून देण्याच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महसूलमंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यातील बेरोजगार स्थापत्य अभियंत्यांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार असून, भूमापन कार्यालयातील प्रलंबित कामांनाही गती मिळणार आहे.

‘महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशन’चे अध्यक्ष अभियंता संजय शिंदे यांनी महसूलमंत्र्यांची भेट घेऊन भूमापन कार्यालयातील मोजणीची कामे स्थापत्य अभियंत्यांना देण्यात यावीत, असे मागणीचे निवेदन सादर केले होते. या निवेदनाची दखल घेत महसूलमंत्री बावनकुळे यांनी तात्काळ संबंधित विभागाच्या सचिवांकडून माहिती मागवून विषयाचा आढावा घेतला. यानंतर सर्वेक्षण व मोजणीची कामे करण्यास इच्छुक असलेल्या स्थापत्य अभियंत्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जमाबंदी आयुक्त (पुणे) यांना दिले.

या निर्णयामुळे भूमापन कार्यालयातील मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे रेंगाळलेली मोजणीची प्रकरणे मार्गी लागण्यास मदत होणार आहे. मोजणीअभावी न्यायालयांमध्ये प्रलंबित राहणारे दावे, जमिनीविषयक वाद आणि इतर प्रशासकीय प्रकरणांमध्ये होणारा विलंब कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांसह शासकीय यंत्रणेचा वेळ आणि मनुष्यबळ यांची होणारी नासाडी रोखण्यास हातभार लागणार आहे.

याशिवाय, महसूल विभागामार्फत राबविण्यात येणारी रस्ते, इमारती आणि इतर पायाभूत सुविधांशी संबंधित स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातील कामेही अभियंत्यांना उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात लवकरच नियोजन बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या बैठकीस महाराष्ट्र इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष अभियंता संजय शिंदे, कार्याध्यक्ष प्रकाश चव्हाण, कार्यकारी सदस्य मनोज माडगुळकर, उपाध्यक्ष निसर्गराज सोनवणे, अमोल आयंचवार, मुंबई विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकादम, सागर भावसार यांच्यासह विविध भागांतील अभियंते उपस्थित होते.

COMMENTS