Homeताज्या बातम्या

नागरिकांनी माहिती द्यावी ; बीएलओशी संपर्क न झाल्यासमतदार यादीतून नाव वगळले जाईल : प्रांताधिकारी पाटील

कर्जत : आगामी कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेंतर्गत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात मतदार पडताळणीचे काम वेगाने सुरू असून, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याशी संपर्क न झाल्यास अथवा आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत सादर न केल्यास संबंधित मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाण्याची शक्यता असल्याचा इशारा प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी दिला आहे.प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओ कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तहसीलदार रवी सत्वन , निवडणूक नायब तहसीलदार योगेश्वर जाधव व  महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी सांगितले की, भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत-जामखेड मतदारसंघात विशेष सखोल पुनर्निरीक्षण मोहीम सुरू आहे. मतदारसंघातील एकूण ३ लाख ५० हजार ५२४ मतदारांपैकी ३ लाख २४ हजार ९२३ मतदारांना अर्जांचे वाटप करण्यात आले असून, आतापर्यंत ६४ हजार ९२७ मतदारांची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात आली आहे.यावेळी प्रांताधिकारी पाटील यांनी स्पष्ट केले की, सन २००२ नंतर तब्बल २४ वर्षांनी मतदार यादीचे सखोल पुनर्निरीक्षण होत आहे. या मोहिमेद्वारे एका व्यक्तीची दोन किंवा अधिक मतदारसंघांमध्ये असलेली नावे रद्द करण्यात येणार असून, पात्र मतदारांची अचूक यादी तयार केली जाणार आहे. मतदार पडताळणीचे शंभर टक्के काम पूर्ण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला.  आगामी कर्जत नगरपंचायत निवडणूक लक्षात घेता प्रत्येक पात्र मतदाराने आपल्या बीएलओशी संपर्क साधून आवश्यक माहिती व कागदपत्रे वेळेत सादर करावीत. अन्यथा मतदार यादीतून नाव वगळले गेल्यास मतदानाचा हक्क गमवावा लागू शकतो. त्यामुळे या विशेष पुनर्निरीक्षण मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले आहे.

बीडचा लाँग मार्च पुणे जिल्ह्यात दाखलउपवर्गीकरण रद्दच्या मागणीसाठी मुंबईकडे कूच
महिलांनी प्रशिक्षणातून व्यवसाय उभा करावा; शालिनी विखे पाटील ; जनसेवा फाउंडेशन अंतर्गत महिलांना प्रशिक्षण
 पावसाअभावी अहिल्यानगरमध्ये खरीपाची केवळ ५४ टक्के पेरणी

COMMENTS