Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती कडून हळदीकुंकू समारंभ संपन्न  

नाशिक प्रतिनिधी -  नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ रविवार दि ११ फेब्रु,२

अल्पवयीन मुलीवर व्हर्च्युअल गँगरेप
सामंजश्यानी वाद मिटविल्यास समाजात शांतता राहते;न्या.वाडकर
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार ः राजू शेट्टी

नाशिक प्रतिनिधी –  नाशिक शहर आणि नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समिती महिला आघाडीच्या वतीने महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ रविवार दि ११ फेब्रु,२०२४ रोजी, श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय.नाशिक (द्वारका) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.  यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम व्यासपीठावर महिला प्रमुख पाहुण्यांना आमंत्रित करण्यात येऊन अध्यक्षीय निवड करण्यात आली. व  संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन महिला पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

व्यासपीठावरील प्रमुख महिला पाहुण्यांचा महिला कार्यकारणीच्या वतीने सत्कार करण्यात आला.  व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षा- सौ कमल विश्वनाथ मेनकर ,तसेच प्रमुख पाहुण्या श्रीमती सुधा विठ्ठल रसाळ ,महिला विकास समितीच्या अध्यक्षा सौ सुवर्णाताई जाधव, उपाध्यक्ष- सौ रंजनाताई रसाळ, कार्याध्यक्षा- श्रीमती शकुंतला जाधव, खजिनदार- सौ स्नेहलता ताई गायकवाड, उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रस्ताविक सौ सुवर्णाताई जाधव यांनी केले. तसेच संक्रांतीचे महत्त्व ,सौ सुनंदाताई सोनवणे यांनी केले. तसेच सौ पल्लवी सोनवणे,  सौ लीलाताई सोनवणे, श्रीमती शकुंतलाताई जाधव, सौ रंजनाताई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आलेल्या सर्वच महिला भगिनींनी आपली ओळख परिचय करून दिला. त्यानंतर लहान मुलांचा -, नृत्याचा मनोरंजनात्मक कार्यक्रम, महिलांचे उखाणे स्पर्धा, रिंग स्पर्धा, तळ्यात मळ्यात, संगीत खुर्ची .अशा विविध मनोरंजनात्मक खेळांचा महिलांनी आनंद घेतला.

  उखाणे स्पर्धेमध्ये विजेत्या  झालेल्या ताईंचा सत्कार पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच खेळ पैठणीचा संगीत खुर्ची मध्ये विजेत्या झालेल्या सौ रुपाली रवी जोंधळे यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पैठणी देऊन सत्कार करण्यात आला.

त्यानंतर अध्यक्षीय भाषण झाले .आलेल्या सर्व महिला माता भगिनींना महिला कार्यकारणीच्या वतीने हळदी कुंकवाचे वाण देण्यात आले.

वरील सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षिका उत्कृष्ट निवेदिका सौ सविताताई हीलाल जगदाळे यांनी केले. व सर्वांचीच मने जिंकली. 

 महिला कार्यकारणीचे आणि महिला कार्यकर्त्यांचे वरील कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले नाशिक जिल्हा कुंभार समाज विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष -श्री रमाकांतजी क्षीरसागर, जिल्हाध्यक्ष श्री सोमनाथ सोनवणे, शहर अध्यक्ष श्री गणेश आहेर यांनी सर्वांचे कौतुक करुन अभिनंदन केले.

COMMENTS