Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते नागपूर उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन

नागपूर, दि. २८:  उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर येथे पार

केरळचे राज्यपाल राजेंद्रजी आर्लेकर यांची ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिरास भेट 
’विठू माऊली तू माऊली जगाची’च्या स्वरांनी नांदेड दुमदुमले; आषाढी महोत्सवात भक्तिरसाची अविस्मरणीय पर्वणी
शिक्षणाच्या माहेरघरात आता ’नशेची’ गंगा? गोकुंद्यात नव्या ’बार’साठी हालचाली; ग्रामपंचायत प्रशासनाची ’अर्थपूर्ण’ डोळेझाक!

नागपूर, दि. २८:  उच्च न्यायालय वकील संघाच्या नवीन बार रूमचे उद्घाटन सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण आर. गवई यांच्या हस्ते नागपूर येथे पार पडले.

उच्च न्यायालय दुसरा मजला, बार रूम क्रमांक ६, येथे आयोजित या कार्यक्रमाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती प्रसन्ना बी. वराळे व न्यायमूर्ती अतुल चांदूरकर, तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक अराधे, नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अनिल किलोर याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि महाराष्ट्र राज्याचे महाधिवक्ता डॉ. बीरेन्द्र सराफ उपस्थित होते.

वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अतुल पांडे आणि सचिव अ‍ॅड. अमोल एम. जलतारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. नव्याने सुसज्ज करण्यात आलेल्या बार रूममुळे वकिलांना कामकाजासाठी अधिक सुविधा व अनुकूल वातावरण मिळणार असून, न्यायालयीन व्यवस्थेच्या दृष्टीने हा एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला आहे. कार्यक्रमाला उच्च न्यायालयातील न्यायाधीश, न्यायीक अधिकारी, वकील संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

COMMENTS