Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धनादेश अनादर प्रकरणी आरोपीस कारावास

   अहिल्यानगर  : नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीला कर्जपरताव्यापोटी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी नगर येथील अतिरिक्त मुख्य न्

एमआयडीसीतील विजेचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आमी संघटना व महावितरणची बैठक
नव्याने दिलेले कुणबी दाखले रद्द करण्यासाठी पाथर्डीत उपोषण
Sangamner :भीषण अपघात…पुलावरून भरधाव वेगात कंटेनर पलटी

 

 अहिल्यानगर  : नगर शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को -ऑप. सोसायटीला कर्जपरताव्यापोटी दिलेला धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी नगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपी धनोज दत्तात्रय शिंदे यांना एक महिना कठोर कारावास व एक लाख ७० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम एका महिन्याच्या आत भरण्याचे आदेश देण्यात आले असून, दंड न भरल्यास आरोपीस आणखी तीन महिने कठोर कारावास भोगावा लागणार आहे.

 भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ मधील कलम २७८(२) अन्वये तसेच निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स ऍक्टच्या कलम १३८ अंतर्गत आरोपीस दोषी ठरविण्यात आले आहे. आरोपीने संबंधित पतसंस्थेकडून एक लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या परताव्यासाठी त्याने बंधन बँक, शाखा केडगाव (अहिल्यानगर) येथील एक लाख ५७ हजार २८७ रुपयांचा धनादेश फिर्यादी संस्थेला दिला होता. मात्र, हा धनादेश बँकेत सादर केल्यानंतर अनादरित झाला.

 यानंतर पतसंस्थेच्या वतीने न्यायालयात फिर्याद दाखल करण्यात आली. सुनावणीदरम्यान संस्थेच्या वतीने साक्षीदार अशोक दत्तात्रय तांबे यांची साक्ष महत्त्वाची ठरली. प्रकरणातील कागदोपत्री पुरावे तसेच फिर्यादीकडील वकील ऍड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी केलेला सुसंगत युक्तिवाद न्यायालयाने ग्राह्य धरत आरोपीस दोषी ठरविले.

 या प्रकरणात फिर्यादी संस्थेकडून ऍड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना ऍड. गणेश शेटे, ऍड. आशिष जाधव व ऍड. जैद शेख यांनी सहकार्य केले.

COMMENTS