Homeताज्या बातम्यामुंबई - ठाणे

NEET परीक्षेच्या नियमावलीत बदल होण्याची शक्यता; वय आणि प्रयत्नांवर मर्यादा येणार?

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेत आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय प्रवेश

नीटमध्ये देशात 172 वी रँक मिळवत वडवणीच्या कृष्णा जाधवचा सुवर्ण पराक्रम!686 गुणांची दमदार कामगिरी; राजर्षी शाहू विद्यालयाकडून गौरव
नीट परीक्षेसाठी कडक नियम लागू; हिजाब-पगडीला परवानगी, पण मोबाईल, स्मार्टवॉचवर बंदी आणि मेडिकल विद्यार्थ्यांच्या सुट्ट्या रद्द!
२२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला! नीट परीक्षेच्या गोंधळावर वर्षा गायकवाडांचा तीव्र संताप
NEET Exam | नीट यूजीची परीक्षा पुन्हा जुन्या पद्धतीनुसार होणार

नवी दिल्ली : नीट (NEET) परीक्षेत आगामी काळात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पेपरफुटी आणि परीक्षा रद्द होण्याच्या पार्श्वभूमीवर आता वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या प्रणालीत सुधारणा करण्याची तयारी सुरू आहे. भविष्यात या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा आणि एकूण प्रयत्नांची मर्यादा (Attempts Limit) लागू केली जाऊ शकते. म्हणजेच, विद्यार्थ्यांना ठराविक वयापर्यंत आणि मर्यादित वेळाच ही परीक्षा देता येईल.

केंद्र सरकारने गुरुवारी संसदीय समितीसमोर सांगितले की, इस्रोचे माजी प्रमुख के. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखालील तज्ज्ञ समितीच्या शिफारशींनुसार परीक्षा व्यवस्थेत हे मोठे बदल केले जाणार आहेत. काँग्रेस खासदार दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय स्थायी समितीसमोर एनटीएने (NTA) या दीर्घकालीन सुधारणांचा आराखडा मांडला.

सध्या नीट परीक्षेसाठी किमान वय १७ वर्षे निश्चित आहे. मात्र, कमाल वयोमर्यादेची अट नाही आणि विद्यार्थी कितीही वेळा ही परीक्षा देऊ शकतात. पण आता या व्यवस्थेत बदल करण्याचे संकेत मिळत आहेत. भविष्यात विद्यार्थ्यांना नेमके किती प्रयत्न मिळतील किंवा वयाची कमाल मर्यादा किती असेल, याबाबत अद्याप अधिकृत आणि स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही, मात्र यावर वेगाने विचार सुरू आहे.

COMMENTS