Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मराठा आंदोलनातील खटले घेतले मागे

गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

नागपूर ः मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी केलेल्या आंदोलनात तब्बल 548 खटले पोलिसांनी दाखल केले होते, त्यातील तब्बल 324 खटले मागे घेण्यात आल्याची माहि

एक अजित पवार ७२ तासांत सटकले.. तिथे शंभर अजित पवार भाजपाला कसे झेपणार?
तीन हजारापेक्षा अधिक ग्रामपंचायतीवर विजय
तिघांचा मला संपवण्याचा प्रयत्न; फडणवीसांचा धक्कादायक खुलासा

नागपूर ः मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी केलेल्या आंदोलनात तब्बल 548 खटले पोलिसांनी दाखल केले होते, त्यातील तब्बल 324 खटले मागे घेण्यात आल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिली. यासोबतच 175 खटले पोलिस महासंचालकांच्या स्तरावर आहे. न्यायालयात 286 खटले मागे घेण्यात आले आहे. नुकसानभरपाई न दिल्याने 10 खटले प्रलंबित आहे. 47 खटले कुठल्याही निकषात न बसल्यामुळे त्यात कारवाई झालेली नाही अशी माहिती देखील गृहमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी बोलताना फडणवीस यांनी विरोधी पक्षांनी या संपूर्ण अधिवेशनात विदर्भाच्या चर्चेचा एकही प्रस्ताव दिला नाही, अशी खंत व्यक्त केली. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहे. नाना पटोले विदर्भवादी आहे. विदर्भाच्या प्रश्‍नांवर चर्चा झाली पाहिजे असे उद्धव ठाकरे बाहेर बोलले. पण उबाठाला विधानसभेत विदर्भाचा विसर पडला. विदर्भामध्ये विदर्भाचा सपशेल विसर पडला हे चिंताजनक आहे असा टोला फडणवीस यांनी हाणला. ड्रग्जच्या संदर्भात 24 हजारहून अधिक आरोपींवर कारवाई केली आहे. 2020 मध्ये 5,321 आरोपींवर कारवाई झाली. तर अडीच वर्षात 13,125 आरोपींवर कारवाई झाली. 23 हजारांची पोलिस भरती झाली. 1976 नंतर पहिल्यांदा या सरकारने पोलिसांचा नवीन आकृतीबंध तयार केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.

आरक्षणावरुन मुख्यमंत्री शिंदेंचे ठाकरेंवर टीकास्र – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर मराठा आरक्षणाच्या मुद्यावर टीका केली. अशोक चव्हाण आता सभागृहात नाहीत. काल त्यांनी आरोप केला की मराठ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नात राजकारण केले. मी अध्यक्ष होऊ नये म्हणून पडद्याआड प्रयत्न केले. मी अध्यक्ष झालो तर तातडीने मराठा आरक्षण मिळावे म्हणून काम करेल. ही भीती अडीच वर्षांचे मुख्यमंत्री व अशोक चव्हाण यांना होती, असा दावाही मुख्यमंत्री शिंदे यांनी करत उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

COMMENTS