Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मढी देवस्थानचा पैसा आणि मालमत्तेच्या गैरवापराला विरोध केल्यानेच मला मारण्याचा कट ः संजय मरकड

पाथर्डी ः देवस्थानच्या पैशाच्या आणि मालमत्तेच्या गैरवापराला  विरोध करत असल्याने 14 डिसेंबर रोजी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असून यात स्थानिक आमदा

माझा सन्मान मतदार संघातील सर्व महिलांचा सन्मान – चैतालीताई काळे
अकोले शहरात डॉ. आंबेडकरांचे भव्य स्मारक उभारा
क्रिकेट सट्टयात गमावलेले पैसे चुकविण्यासाठी दागिन्यांची चोरी

पाथर्डी ः देवस्थानच्या पैशाच्या आणि मालमत्तेच्या गैरवापराला  विरोध करत असल्याने 14 डिसेंबर रोजी माझ्यावर जीवघेणा हल्ला झाला असून यात स्थानिक आमदाराचा काही संबंध नसेल तर 10 डिसेंबर रोजी त्यांच्या निवासस्थानी विश्‍वस्त मंडळाची कोणत्या विषयांवर बैठक झाली याचे चित्रीकरण दाखवावे. अशा हल्ल्याने मी थांबणार नसून अधिक जोमाने गावाच्या आणि तालुक्याच्या विकासासाठी काम करत राहणार आहे असे प्रतिपादन मढी देवस्थानचे संजय मरकड यांनी केले. ते मढी देवस्थान येथे दोन गटात झालेल्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर पाथर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.
तालुक्यातील श्री क्षेत्र मढी देवस्थान येथे 14 डिसेंबर रोजी दोन गटात अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बोलवण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी हाणामारीतनंतर ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड यांनी हा हल्ला भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांच्या सांगण्यावरून झाल्याचा गंभीर आरोप प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत केला होता.या आरोपाचे खंडन मढी येथील विश्‍वस्तांनी पत्रकार परिषदेत केले होते.त्या पत्रकार परिषदेला उत्तर देताना मरकड बोलत होते.यावेळी भाजपा ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौन्ड,माजी सरपंच देविदास मरकड,सदाशिव मरकड,नितीन शेळके,शरद कुटे,अंबादास आरोळे,फिरोज शेख आदी जण उपस्थित होते. पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,मी अध्यक्ष असताना मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मागील कालावधीत बैठक लावत न्यायालायच्या आदेशाला न जुमानता मला अध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता.मी जबाब देताना माझी शारीरिक आणि मानसिक स्थिती नव्हती.पोलिसांनी 307 किंवा 326 प्रमाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही तर मी न्यायालयामार्फ़त 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यासाठी कायदेशीर लढणार आहे.

आमदाराच्या दबावामुळे 307 दाखल होण्यास विलंब- उपमुख्यमंत्री यांनी या घटनेमध्ये 307 प्रमाणे गुन्हा दाखल व्हावा, आमदाराच्या दबावामुळे 307 गुन्हा दाखल होत नसून आपल्याच पक्षाचे लोकप्रतिनिधीं पदाधिकार्‍यावर हल्ले करीत असेल तर निवडणूक कोणाच्या जीवावर लढणार आहात अशा मजकूराचे पत्र पाठवले असून अधिवेशन संपल्यानंतर त्याची भेट घेणार असल्याचे संजय मरकड यांनी यावेळी सांगितले.

पक्षाच्या पदाधिकार्‍यावर हल्ले होणे वेदनादायक ः गोकुळ दौड – मढी येथील झालेली घटना वेदनादायक असून लोकप्रतिनिधींना नेमकं काय करायचे हेच कळत नसून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. गेल्या पंचवीस तीस वर्षे पक्षासाठी काम करणार्‍या पदाधिकार्‍यांवर हल्ले होत असतील, गुन्हे दाखल होत असतील ही राजकीय विचारधारा नसून हे खेदजनक आहे. तालुक्याच्या विकासात्मक कामाबद्दल कोणी बोलायचं नाहीं का? आज त्यांच्यासोबत फक्त लाभदारक कार्यकर्ते उरले असून पाथर्डी शेवगाव तालुक्यातील सामान्य माणूस उरला नसून येणार्‍या निवडणुकीत यांचे उत्तर शेवगाव पाथर्डी जनता देईल, असे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष गोकुळ दौड यांनी म्हटले आहे.

COMMENTS