Homeकृषी

जनावरांचे बाजारासह बैलगाडी शर्यती थांबल्याच पाहिजेत : आ. बाळासाहेब पाटील

कराड / प्रतिनिधी : लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो. त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे ब

शेतकऱ्यांना कर्जासाठी ‘सिबिल’ची सक्ती नको; मुख्यमंत्र्यांच्या बँकांना सूचना अल निनोच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर तयारी
शेतकरी बापाला न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांचे २७ सप्टेंबरला आंदोलन
९३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांनी केली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण : महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

कराड / प्रतिनिधी : लम्पी स्किनचा खिलारे गाई, खिलार बैल यांच्यावर जास्त परिणाम होतो. त्यांना पहिले लक्ष्य केले जात आहे. त्यामुळे सध्या जनावरांचे बाजार बंद करण्यात आले आहेत. बैलगाडी शर्यंतींना परवानगी मिळाल्याने सध्या मोठ्या प्रमाणावर खिलार जातीच्या बैलाच्या शर्यंती होत आहेत. तेंव्हा शर्यंतीमुळे जनावरे एकत्रित येण्याचे मोठे प्रमाण बैलगाडी शर्यंतीमुळे होत आहे. तेंव्हा लम्पी स्किन आजारावर प्रतिबंध घालण्यासाठी बैलगाडी शर्यतींही बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केली आहे.
कराड येथील शासकीय विश्रामगृह पाळीव जनावरांना होणार्‍या ’लम्पी स्किन’ या संसर्गजन्य रोगाच्या उपाययोजनां संदर्भात पशुसंवर्धन विभागाची तातडीची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. बैठकीस कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार विजय पवार, गटविकास अधिकारी सौ. मीना साळुंखे, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ.अनिल देशपांडे, सहाय्यक आयुक्त लघु पशुचिकित्सालय कराड डॉ. बी. डी. बोर्डे, पशुधन विकास अधिकारी पंचायत समिती कराड डॉ. दुर्गदास उंडेगांवकर, सर्व पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक उपस्थित होते.
या संसर्गजन्य रोगविषयी लोकांमध्ये जनजागृती करणे गरजचे आहे. त्यासाठी ध्वनिक्षेपकाचा वापर करावा. वैद्यकीय अधिकार्‍यांनी नेमून दिलेल्या गावी शेतकर्‍यांच्या जनावरांच्या गोठ्यावंर जाऊन आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात मार्गदर्शन करावे, अशा सूचना आ. बाळासाहेब पाटील यांनी यावेळी केल्या.

COMMENTS