Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत 25 वर्षीय एअर होस्टेसची निर्घृण हत्या

मुंबई प्रतिनिधी - मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर

पुण्यातील थिएटरबाहेर हत्येचा थरार, तलवारीने हल्ला करत तरुणाला संपवलं
शिवीगाळ केल्याने केला तरुणाचा खून
पाकिस्तानात क्रूरतेचा कळस.

मुंबई प्रतिनिधी – मुंबईतील पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका इमारतीमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडल्याची माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पवईमध्ये एका इमारतीमधील फ्लॅटमध्ये मुलीचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. दरम्यान, फ्लॅटमध्ये तरुणीचा मृतदेह सापड्याने इमारतीमधील रहिवाशांना धक्का बसला आहे. मुंबई पोलिसांचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मारवाह रोडवर असलेल्या एनजी हाऊसिंग सोसायटीमध्ये 25 वर्षीय तरुणीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, हत्येचा गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींना पकडण्यासाठी चार पथके तयार करण्यात आली आहेत.मृत तरुणी एअर होस्टेस असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र ही मृत तरुणी कोण आहे, ती फ्लॅटमध्ये कधीपासून एकटीच राहत होती आणि तिच्या हत्येमागचे कारण काय याबाबत पोलीस प्रत्येकाकडे तपास करत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रूपल ओगरे (वय 23, रायपूर, छत्तीसगड) असं या एअर होस्टेसचं नाव आहे. रुपल ही पवईतल्या एनजी कॉम्प्लेक्स इथे तिची बहिण आणि मित्रासोबत राहायला होती. हत्येची घटना घडली तेव्हा रुपल घरी एकटीच होती. तिची बहिण आणि मित्र हे दोघेही आपल्या गावी गेले होते.  मुंबई पोलिसांचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, पवई पोलिसांच्या हद्दीतील एका इमारतीच्या फ्लॅटमध्ये एका मुलीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला आहे, आम्ही प्रत्येक बाबींचा तपास करत आहोत. मृत तरुणी एअर होस्टेस होती, तिची नुकतीच एअर होस्टेस म्हणून निवड झाली होती.

COMMENTS