कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव तालुक्यातील वृद्ध दाम्पत्याचा हत्या करणारे तीन आरोपी जेरबंद

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील जालिंदर दत्तात्रय भुजाडे हे नोकरीनिमित्त कुटुंबीयांसह पुणे येथे राहतात ३० मे ते १ जुन २०२२ रोजीच

संगमनेरचे सहकार मॉडेल देशाला दिशादर्शक – आ.डॉ.तांबे
खाद्यतेल आणखी महागणार | DAINIK LOKMNTHAN
चिमूरच्या विकास आराखड्याबाबत राज्य सरकार सकारात्मक : उपमुख्यमंत्री फडणवीस

कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव तालुक्यातील आपेगाव येथील जालिंदर दत्तात्रय भुजाडे हे नोकरीनिमित्त कुटुंबीयांसह पुणे येथे राहतात ३० मे ते १ जुन २०२२ रोजीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात आरोपींनी रात्रीच्या वेळी घराच्या छतावर प्रवेश करून झोपेत असलेले फिर्यादीचे आई राधाबाई दत्तात्रय भुजाडे व वडील दत्तात्रय गंगाधर भुजाडे अशा दोघांची अज्ञात हत्याराने हत्या करून घरातील कपाटाची उचका-पाचक करून १ लाख ९० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी करून गेले या नुसार कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर १९७/२०२२ भादवि कलम ३०२,३९७,३९४ प्रमाणे जबरी चोरी व खुनाचा गुन्हा बुधवार १ जून रोजी रात्री उशिरा दाखल करण्यात आला होता.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील, पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना व मार्गदर्शन केले. त्यानुसार पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे तीन विशेष पथके नेमून तपासाबाबत सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा व कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे संयुक्त पथक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तसेच अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींची माहिती प्राप्त करून घेत असताना पथकास गुप्त बातमी दाराकडून माहिती मिळाली की सदरचा गुन्हा अजय काळे राहणार पढेगाव ता. कोपरगाव याने त्याच्या साथीदारासह केला असून तो आता त्याच्या राहत्या घरी असुन कुठेतरी पळून जाण्याच्या तयारीत आहे आता गेल्यास मिळून येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकातील पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस सब इन्स्पेक्टर सोपान गोरे, सहाय्यक फौजदार बाळासाहेब मुळीक, मोहन गाजरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय हिंगडे, सुनील चव्हाण,पोलीस नाईक शंकर चौधरी, विशाल दळवी, राहुल सोळंकी, सचिन आडवल, संदीप चव्हाण, दीपक शिंदे, भरत बुधवंत पोलीस कॉन्स्टेबल सागर ससाणे, रोहित यमुल, रंणजीत जाधव, पोलीस हेडकॉन्स्टेबल बबन बेरड, चंद्रकांत कुसळकर, अर्जुन बडे तसेच कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड व पोलीस हेडकॉन्स्टेबल इरफान शेख यांनी मिळून कोपरगाव तालुक्यातील पढेगाव येथे जाऊन आरोपी अजय काळे याच्या वास्तव्याबाबत माहिती घेत असताना अचानकपणे एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून जाऊ लागला असता पथकातील अंमलदार यांनी तत्काळ पाठलाग करून पळून जाणाऱ्या इसमास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले असता त्याने त्याचे नाव अजय छंदू काळे (वय वर्ष १९) राहणार पढेगाव असे असल्याचे सांगितले त्याच्याकडे वरील गुन्हा बाबत अधिक चौकशी केली असता तो सुरुवातीला उडवा-उडवीचे उत्तरे देऊ लागला परंतु पोलिसांनी अधिक विश्वासात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा त्याचा साथीदार अमित कागद चव्हाण (वय वर्ष २०) राहणार हिंगणी हल्ली मुक्काम पढेगाव व जंतेश छंदु काळे ( वय वर्ष २२) राहणार पढेगाव अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. सदर माहितीनुसार आरोपी अमित चव्हाण व जंतेश काळे यांचा त्यांच्या राहत्या घरी जाऊन शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना पोलिसांनी ताब्यात घेत कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथे हजर केले असून पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे. सदरची कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर,उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व कोपरगाव तालुका पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या सह पथकातील पोलिस अधिकारी , अंमलदार यांनी केली आहे.

COMMENTS