टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल-गडकरी

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल-गडकरी

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाव आपल्या दर्जेदार कामासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत . देशातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ते काम करत आहेत. आपल्या स्

शिकारीसाठी विनापरवाना प्रवेश; संशयितांकडून घोरपडीवर अत्याचार; अत्याचाराचा व्हिडीओ पाहून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे अधिकारी चक्रावले
निवडणूक आयुक्तांची समितीद्वारे होणार निवड
मुंबईमध्ये सहा ठिकाणी बॉम्ब वाहतूक पोलिसांना धमकीचा मेसेज

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नाव आपल्या दर्जेदार कामासाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत . देशातील रस्त्यांचा दर्जा सुधारण्यासाठी ते काम करत आहेत. आपल्या स्पष्ट वक्तेपणासाठी पण नितीन गडकरी ओळखले जातात. अधीकारी, कंत्राटदार या सर्वांना नियमात राहुन काम करण्याच्या सूचना नितीन गडकरी देतात आणि काम सुद्धा करून घेतात.

नागपूर सह विदर्भातील दुध उत्पादाला चालना देण्याचं आवाहन गडकरींनी केलं आहे. टार्गेट पूर्ण केलं तर गळ्यात फुलांची माळ पडेल, अन्यथा सक्तीची स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल, या शब्दात गडकरींनी पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि प्राध्यापकांना खडसावलं आहे. महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरमार्फत पशुवैद्यकीय चिकित्सा संकुल इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.

गडकरींनी अधिकारी, शास्त्रज्ञ, प्राध्यापक या सर्वांना यावेळी आपल्या कामाबाबत सजग रहाण्याच्या सूचना केल्या आहेत. नागपूरच्या या विद्यापिठातून चांगल्या क्षमतेचे संशोधन व्हावं. या संशोधनाचा फायदा थेट शेतकऱ्यांना व्हावा, असंही गडकरी म्हणाले आहेत.

COMMENTS