भाजपा यु वा मोर्चाने हर घर तिरंगा उपक्रमाची जबाबदारी यशस्वी पार पाडली- आमदार मोनिका राजळे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपा यु वा मोर्चाने हर घर तिरंगा उपक्रमाची जबाबदारी यशस्वी पार पाडली- आमदार मोनिका राजळे

पाथर्डी ( प्रतिनिधी) जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे.आगामी काळात भारतातील तरूण भारतासह जगावर राज्य करतील यात तीळमात्र शंका नाही.देश स्वा

दुचाकीस्वाराला जखमी करून पळून जाणाऱ्या पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
*हम दो, हमारे तीन!; चीनमध्ये नवे संतती धोरण लागू होणार l पहा LokNews24*
परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा

पाथर्डी ( प्रतिनिधी) जगात सर्वात जास्त तरुणांची संख्या भारतात आहे.आगामी काळात भारतातील तरूण भारतासह जगावर राज्य करतील यात तीळमात्र शंका नाही.देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमीत्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतुन आजादी का महोत्सव देशभर मोठया उत्साहात साजरा होणार असुन गेल्या आठ दिवसापासून तालुक्याच्या ग्रामीण भागासह शहरात चांगले कार्यक्रम घेतले.शहरातुन भव्य तिरंगा रॅली काढुन पक्षाने दिलेली जबाबदारी युवा मोर्चाने यशस्वीरित्या पार पाडली असे प्रतिपादन आ.मोनिका राजळे यांनी केले.

पाथर्डी तालुका भाजपा युवा मोर्चाच्या वतीने शहरातुन हर घर तिरंगा उपक्रमाबाबत जनजागृती दुचाकी रॅली काढण्यात आली होती आमदार मोनिका राजळे स्वतः दुचाकी चालवित रॅलीत सहभागी झाल्या होत्या त्यानंतर रॅलीचा शहरातील लोकनेते आप्पासाहेब राजळे बहुउद्देशीय सभागृहात समारोप करण्यात आला त्यावेळी युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसमोर आ.राजळे बोलत होत्या.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर,शहराध्यक्ष अजय भंडारी,डॉ.मृत्युंजय गर्जे,नंदकुमार शेळके,बजरंग घोडके,महेश बोरूडे,रमेश गोरे,मंगल कोकाटे,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे,युवा मोर्चाचे प्रदेश सचिव कुशल भापसे,सोमनाथ अकोलकर,अँड.प्रतीक खेडकर,शुभम गाडे,संभाजी गर्जे,ललित खेडकर,नितिन एडके,संदिप पवार,वैभव खेडकर,सचिन रोडी,हर्षद गर्जे,महेश हजारे,किरण पुरी,अशोक दहिफळे,किसनदेव भाबड,इजाज शेख,ललित खेडकर,सचिन रोडी,बाळासाहेब चितळे, सागर पाथरकर,राहुल नेहुल,श्रीकांत आटकर आदि जण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सचिन वायकर,सुत्रसंचालन हारिभाऊ वायकर तर आभार हर्षद गर्जे यांनी मानले.

COMMENTS