Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुःखमुक्तीसाठी समाजाला बुद्धांच्या विचारांची गरज ः प्रा. महेंद्र मिसाळ

श्रीगोंदा शहर : सत्यशोधक विचार मंथन आश्रम, पिंप्री कोलंदर श्रीगोंदा यांच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जा

अपघाताने नगराध्यक्ष झालेल्यांनी माझ्यावर जाणीपूर्वक आरोप करू नये : माजी नगरसेवक बंडू बोरुडे
शिवस्वराज्य दिन’ साजरा करण्यासाठी नियमावली जारी l पहा LokNews24
माऊलीच्या मदतीने तिला मिळतंय आयुष्याचं दान…

श्रीगोंदा शहर : सत्यशोधक विचार मंथन आश्रम, पिंप्री कोलंदर श्रीगोंदा यांच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या वर्षी बुद्ध जयंती निमित्त व्याख्यानमालेचा सप्ताह आयोजन केलेला आहे. विविध व्याख्याते येथे रोज व्याख्यानसाठी येत आहेत. 19 मे रोजी सायं.8 वाजता सुप्रसिदध व्याख्याते व लेखक प्रा. महेंद्र मिसाळ यांचे बुद्धाचा जीवनपटया विषयावर व्याख्यान संपन्न झाले. यावेळी मिसाळ यांनी गौतम बुद्धांचा जीवनप्रवास सांगुन आज समाजाला दुःख दुर करण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज आहे हे प्रतिपादन केले.विविध मनोरंजनात्मक गोष्टी सांगुन त्यांनी बुद्ध तत्त्वज्ञान संगितले. व्याख्यानासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सत्यशोधक आश्रमाचे प्रमुख बाळासाहेब धोत्रे महाराज व त्यांच्या सर्व सहका-यानीं राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

COMMENTS