कमिशन न दिल्यामुळे भाजपच्या नेत्याची ठेकेदाराला मारहाण

Homeताज्या बातम्याअहमदनगर

कमिशन न दिल्यामुळे भाजपच्या नेत्याची ठेकेदाराला मारहाण

अहिल्यानगर /कर्जत तालुक्यातील राशीन येथील राजे वस्ती परिसरात रॅम्सन सोलर पल्स या कंपनीचे प्रोजेक्टचे काम सुरु आहे. या साइटवर वसीम नौशाद शेख हे सिविल

महानगरपालिकेच्या कार्यालयात भरवले खड्ड्यांचे प्रदर्शन…
पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून आंदोलन l पहा LokNews24
’वैभवशाली श्रीरामपूर’ सारखे अनमोल पुस्तक दिशादर्शकच : दिनकर


अहिल्यानगर /
कर्जत तालुक्यातील राशीन येथील राजे वस्ती परिसरात रॅम्सन सोलर पल्स या कंपनीचे प्रोजेक्टचे काम सुरु आहे. या साइटवर वसीम नौशाद शेख हे सिविल कॉन्ट्रॅक्टर राहणार भिगवन हे महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती योजने अंतर्गत काम करत होते.

कामाच्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची नेते शहाजीराजे भोसले, युवराज राजे भोसले, श्री गुटाळ व आणखी सात ते आठ अनोळखी युवक आले आणि त्यांनी या कामासाठी 12 टक्के कमिशन मागणी करून देत नाही म्हणून काम बंद पाडले. त्या ठिकाणी असलेल्या साहित्याची जेसीबी मशीन आणून नासधूस केली.

यानंतर वसीम शेख हे कंपनीचे अधिकारी सुनील तिवारी व रमेश कुमार सहा आणि पोलीस या सर्वांना घेऊन त्या ठिकाणी झालेल्या नुकसानाची माहिती देत होते.

त्या वेळी पुन्हा युवराज राजे भोसले यांनी सात ते आठ लोक जमवून सुनील तिवारी व रमेश कुमार सहा यांना लाकडी काठ्या, लोखंडी रॉड, लोखंडी चैन,फायबर टिकावाचा दांडा याने जबर मारहाण केली व फिर्यादी वसीम शेख व सुनील कुमार चा मोबाईल फोन, तसेच चार चाकी गाडीची चावी व रोख पंचवीस हजार रुपये काढून घेतले आहेत.

अशी तक्रार वसीम शेख यांनी कर्जत पोलीस स्टेशन येथे दिले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून शंकरराव उर्फ शहाजी भाऊसाहेब राजे भोसले वय 45 वर्ष यास अटक करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

COMMENTS