Homeताज्या बातम्यादेश

केरळमध्ये मोठा स्फोट, एकाचा मृत्यू, 35 जण जखमी!

केरळ प्रतिनिधी - केरळमधील कोची येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून

राज्यातील ‘या’ शेकडो शाळांना 23 ऑगस्ट 2025 पर्यंत सुट्टी जाहीर !
महाविकास आघाडी सरकारने आरक्षण वाचवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले : नाना पटोले | LOKNews24
जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होणार? पंतप्रधानांनी बोलविली सर्वपक्षीय बैठक; राज्याचा दर्जा देण्याची शक्यता

केरळ प्रतिनिधी – केरळमधील कोची येथील कलामासेरी येथील जामरा इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला असून 20 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सकाळी 9.40 वाजता हा स्फोट झाला. स्फोट झाला तेव्हा कन्व्हेन्शन सेंटरमध्ये सार्वजनिक कार्यक्रम सुरू होता. स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. पाच जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, काही मिनिटांतच तीन स्फोट झाले. एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, प्रार्थना संपल्यानंतर काही सेकंदात हा स्फोट झाला. पहिला स्फोट हॉलच्या मध्यभागी झाला. काही सेकंदांनंतर, हॉलच्या दोन्ही बाजूला एकाच वेळी आणखी दोन स्फोट झाले

COMMENTS