Homeताज्या बातम्याराजकारण

भोजपुरी अभिनेते पवन सिंह यांची निवडणुकीतून माघार

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांचे पश्

लोकशाही, सुशासन बळकट करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाची भूमिका महत्त्वाची – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
पटपडताळणीनिमित्त विद्यालयाला भेट; वेतन अधीक्षक राजेश खटावकर यांचा मुप्टा संघटनेतर्फे गौरव
पावसाळ्यात नदी व खाडी किनाऱ्यावर नैसर्गिक आपत्ती परिस्थितीवर मात करण्यासाठी पोलिसांचे मॉकड्रील

नवी दिल्ली : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी 16 राज्यांतील 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. या यादीत भोजपुरी अभिनेते आणि गायक पवन सिंह यांचे पश्‍चिम बंगालमधील आसनसोल या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र पवन सिंह यांनी रविवारी आपण निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे जाहीर केले आहे. एक्स वर एक पोस्ट टाकून त्यांनी निवडणूक लढविता येणार नसल्याचे सांगितले आहे. या पोस्टमध्ये पवन सिंह म्हणाले, मी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे आभार मानतो. पक्षाने माझ्यावर विश्‍वास टाकून मला आसनसोलसाठी उमेदवारी दिली. पण मी काही कारणास्तव आसनसोल या मतदारसंघातून निवडणूक लढवू इच्छित नाही. या पोस्टमध्ये पवन सिंह यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना टॅग केले आहे.

COMMENTS