Homeताज्या बातम्यामनोरंजन

सलमान खान च्या ‘बॉडीगार्ड’ चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्दिकी यांचं निधन

मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन झाले आहे. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्या

वीस लाखांचा दरोडा टाकणारी टोळी गजाआड
मढी देवस्थानचा पैसा आणि मालमत्तेच्या गैरवापराला विरोध केल्यानेच मला मारण्याचा कट ः संजय मरकड
वर्गात पेपर लिहीत असताना 9 वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

मल्याळम चित्रपटांचे प्रसिद्ध दिग्दर्शक सिद्दिकी यांचे निधन झाले आहे. मंगळवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोची येथील अमृता रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी त्यांच्यावर न्यूमोनिया आणि यकृताशी संबंधित समस्यांवर उपचार सुरू होते. सिद्दीक यांना त्यांच्या आजारपणानंतर एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन मशीनच्या आधारावर ठेवण्यात आले होते. 8 ऑगस्ट रोजी एक वैद्यकीय मंडळ सिद्दीकच्या प्रकृतीचे मूल्यांकन करून पुढील कारवाई ठरवणार होते. लोकप्रिय मल्याळम अभिनेता दुल्कर सलमानने सोशल मीडियावर दिवंगत दिग्दर्शकाला श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या निधनाने दक्षिणेसह बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. अभिनेता आणि निर्माते अतुल अग्निहोत्री यांनीही सिद्दीकीच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. सिद्दीकीने 1989 मध्ये ‘रामजी राव स्पीकिंग’ या मल्याळम चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते. 1986 मध्ये ‘पप्पन प्रियापेट्टा पप्पन’ या मल्याळम चित्रपटाद्वारे त्यांनी पटकथा लेखक म्हणून पदार्पण केले. मोठ्या पडद्यावर आलेला त्यांचा शेवटचा चित्रपट ‘बिग ब्रदर’ होता. त्यांनी सलमान खानचा बॉडीगार्ड हा चित्रपटही दिग्दर्शित केला होता. हा चित्रपट 2011 साली आला होता. रिलीजनंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.  दिग्दर्शनासोबतच सिद्दीकीने अनेक चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. 2022 मध्ये तो ‘केनकेमम’ या चित्रपटात विशेष भूमिकेत दिसले होते.

COMMENTS