Homeताज्या बातम्या

बीडच्या ‘भिमकन्या’ आम्रपाली साबळे यांना प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय युवा लोकमित्र रणरागिणी सामाजिक गौरव पुरस्कार’ जाहीर!

बीड : महामानवांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा उराशी बाळगून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध अखंड संघर्ष करणाऱ्या बीड येथील अग्रगण्य सामाजिक कार

Yeola : नगर – मनमाड महामार्ग रोखला…. (Video)
भारत-कॅनडामध्ये पुन्हा तणाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थितीत निशिकांत भोसले-पाटील आज उमेदवारी अर्ज भरणार : केदार पाटील

बीड : महामानवांच्या पुरोगामी विचारसरणीचा वारसा उराशी बाळगून अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरुद्ध अखंड संघर्ष करणाऱ्या बीड येथील अग्रगण्य सामाजिक कार्यकर्त्या तथा ‘रणरागिणी प्रतिष्ठान’च्या अध्यक्षा आम्रपाली साबळे यांना यंदाचा अत्यंत मानाचा आणि प्रतिष्ठित ‘राज्यस्तरीय युवा लोकमित्र रणरागिणी सामाजिक गौरव पुरस्कार २०२६’ जाहीर झाला आहे. ‘साप्ताहिक युवा लोकमित्र’ वृत्तपत्राच्या ५ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या निर्भय आणि धडाकेबाज कामगिरीबद्दल त्यांची या पुरस्कारासाठी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

आम्रपाली साबळे या फुले, शाहू, आंबेडकर विचारसरणीच्या कट्टर अनुयायी असून, बीड जिल्हा आणि संपूर्ण मराठवाड्यात अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवणाऱ्या आक्रमक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. ‘रणरागिणी प्रतिष्ठान’च्या माध्यमातून त्यांनी अनेक वंचित, पीडित आणि महिलांना न्याय मिळवून दिला आहे, तर ‘अन्याय, अत्याचार व भ्रष्टाचार निर्मूलन समिती’च्या मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून प्रशासकीय अनागोंदीविरोधात सातत्याने संघर्ष केला आहे. त्यांच्या याच लढाऊ वृत्तीची दखल आता राज्यस्तरावर घेतली गेली आहे.

हा दिमाखदार पुरस्कार वितरण सोहळा शनिवार, २० जून २०२६ रोजी संध्याकाळी ०६:०० वाजता ‘ताज पॅलेस’, कादरपुरा, बार्शीनाका, बीड येथे अत्यंत उत्साहात पार पडणार आहे. या सोहळ्याला राजकीय, प्रशासकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल बीड जिल्ह्यातील पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ते, विविध सामाजिक संघटना आणि राजकीय वर्तुळातून आम्रपाली साबळे यांच्यावर अभिनंदनाचा प्रचंड वर्षाव होत आहे.

COMMENTS